बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुलाखती दरम्यान माजी नगरसेवकाच्या गैरकृत्याचा व्हिडिओ पाहून अजित पवार यांचा पाराच चढला!
गैरकृत्याचा व्हिडिओ अजित पवार यांना दाखवला.

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मुलाखती दरम्यान माजी नगरसेवकाच्या भावाच्या गैरकृत्याचा व्हिडिओ पाहून अजित पवार यांचा पाराच चढला!
गैरकृत्याचा व्हिडिओ अजित पवार यांना दाखवला.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. या मुलाखतीदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मुलाखतीदरम्यान एका माजी नगरसेवकाने उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता.मात्र,त्याच प्रभागातील कार्यकर्त्यांनी त्या माजी नगरसेवकाच्या भावाचा गैरकृत्याचा व्हिडिओ अजित पवार यांना दाखवला.व्हिडिओ पाहताच अजित पवार प्रचंड संतापले आणि थेट…. बोलावून त्या माजी नगरसेवकाला सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले.
पक्षातीलचं कार्यकर्त्यांनी अजित पवारांना सांगितले की,या माजी नगरसेवकाच्या भावामुळे”या माजी नगरसेवकाला तिकीट देऊ नका; त्याच प्रभागातून इतर कोणालाही उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा निष्ठेने प्रचार करू.कार्यकर्त्यांची भूमिका पाहून अजित पवारांनी संबंधितांची बाजू ऐकून घेतली आणि उमेदवारीबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहितीची खात्री करण्याचे निर्देश पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले. बारामतीतील काही प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांच्या दहशतीला नागरिक घाबरत असून ते याबाबत पुढे बोलण्यास येत नाहीत अशीही चर्चा सुरू आहे.
या घटनेनंतर इतरही काही माजी नगरसेवकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. मुलाखतीदरम्यान नागरिकच थेट अजित पवारांसमोर माजी नगरसेवकांच्या कार्यकाळातील त्रुटी, गैरव्यवहार आणि जनतेशी असलेले संबंध मांडले.त्यामुळे काही माजी नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
बारामतीमध्ये सुरू असलेल्या या मुलाखतींमुळे पक्षातील अंतर्गत वादही उघडपणे समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गटबाजी, नाराजी आणि तक्रारीमुळे अजित पवारांना परिस्थिती हाताळणे कठीण जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट
माजी नगरसेवकाच्या कुटुंबातला हा तर वेगळाच प्रकार
बारामतीतील आणखी एका प्रभागातही वेगळी घटना घडली आहे.एका कुटुंबामध्ये आंतरजातीय विवाह असून त्या महिलेने माहेरचे नाव वापरून उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.परंतु तेथे उपस्थित असणाऱ्या समाज बांधवांनी माहेरचे नाव वापरून तिकीट देण्यास विरोध केला. मात्र या प्रकाराची चर्चा बारामतीमध्ये चांगलीच रंगली आहे.






