राजकीय

बारामती नगरपालिका निवडणूक इच्छुकांची धाक धुक वाढली

उमेदवारांच्या निवडीबाबत ते कोणतेही थेट भाष्य केलं नाही.

बारामती नगरपालिका निवडणूक इच्छुकांची धाक धुक वाढली

उमेदवारांच्या निवडीबाबत ते कोणतेही थेट भाष्य केलं नाही.

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक निर्माण झाली आहे.निवडणुकीची रंगत वाढत असताना, उमेदवारांसाठी चांगला संधी मिळवण्याची आणि विजयासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.याच दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

मुलाखतींनंतर अजित पवार मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. मात्र, नगराध्यक्षपदासाठी किंवा अन्य उमेदवारांच्या निवडीबाबत ते कोणतेही थेट भाष्य केलं नाही. यामुळे,बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.

नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी किती उमेदवार आहेत, आणि त्यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल, यावर अजूनही चर्चासत्र सुरू आहे.या निवडणुकीत उमेदवारांना उमेदवारी मिळणार की नाही, आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे बारामतीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणाचे कसे आणि कुणाचे उमेदवारी प्राप्त होईल,यावर अजित पवार यांच्या निर्णयावर आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत चर्चा व निवडीवर सर्वांची नजर आहे.

या पार्श्वभूमीवर,उमेदवारांच्या मनातील अनिश्चितता आणि त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न अधिक गडद झाला आहे. त्यामुळे सध्या ते आपली राजकीय रणनीती आणि पक्षाच्या निर्णयाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Back to top button