दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? ‘मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत’, अजितदादांचा काकांबद्दल बारामतीमध्ये वेगळाच सूर; म्हणाले, ‘झाले गेले…’
माझंही साहेबांवर प्रेम आहेच ना

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? ‘मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत’, अजितदादांचा काकांबद्दल बारामतीमध्ये वेगळाच सूर; म्हणाले, ‘झाले गेले…’
माझंही साहेबांवर प्रेम आहेच ना
बारामती वार्तापत्र
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र येण्याबाबत अनेक ठिकाणी चाचपणी सुरू आहेत. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यामधील एका नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपविरोधात निवडणूक लढणार आहे.
त्यात बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार प्रेम व्यक्त केले आहे.
माझंही साहेबावर प्रेम आहे
बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते म्हणाले, खासदार की आमदारकीला काय झाले हे सोडून द्या. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. निवडणुकीत काय झाले एका बाजूला आदरणीय पवारसाहेब आहेत. एका बाजूला अजित पवार आहे. बारामतीकरांपुढे प्रश्न निर्माण होणारच ना. का काहींचे प्रेम साहेबांवर नसावे, असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना.मी काही राजकीय भूमिका घेतली आहे. त्याच्या इतका बारीक विचार करणे चुकीचे आहे. दिलदारपणा, मोठेपणा वाढवा. मनाचा मोठेपणा वाढवा. कालपर्यंत एकत्रच होतो ना ? सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत आहेत ना ? काय वरणं पडलो काय मी ? हे कसं मी विसरणार आहे, असे अजितदादा म्हणाले.
झालं गेलं गंगेला मिळालं
तुम्ही संकोचित विचारचे राहू नका. मला काही माणसं जोडायची असतात. झालं गेलं गंगेला मिळाले, झालं केलं कऱ्हेला मिळालं. निरेला मिळालं, तेथून चंद्रभागेला मिळालं, असंही अजितदादा म्हणाले. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हशा पिकला.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चाचपणी सुरू आहे. नगरपालिकेला एकत्र आल्यास झेडपी, महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्ष येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. असे झाले तर राज्याची राजकारणात उलथापालथ होऊ शकते.





