
कविवर्य मोरोपंत वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन संपन्न
स्पर्धेचे हे ५२ वे वर्ष होते.
बारामती वार्तापत्र
सळसळता उत्साह आणि जोश, अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी यामुळे यंदाची मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा चांगलीच रंगतदार ठरली. महाराष्ट्राला आजवर दर्जेदार वक्ते देणा-या कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद गागरे नितीन जगन्नाथ, कला वाणिज्य महाविदयालय वारजे, पुणे याने पटकावले. तर वादविवाद स्पर्धेचे मानकरी ठरला न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पारनेर यांचा संघ. वक्तृत्वाचा कस लागणा-या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद वनारे अनिकेत रामा, संताजी महाविद्यालय, नागपूर याने पटकावले. तर कनिष्ठ महाविद्यालय विभागामध्ये चिन्मय संजय कदम, फग्र्युसन महाविद्यालय, पुणे ने प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक, डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील मोरोपंत विषयातील वरिष्ठ विभागामध्ये मोरोपंत विषयात प्रथम क्रमांक सर परशुराम महाविद्यालय, पुणे चे काणे पूर्वी शिवप्रसाद ने मिळवला. कनिष्ठ विभागामध्ये मोरोपंत विषयात प्रथम क्रमांक साक्षी राहूल सणस, शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर हिने मिळवला.
बारामती नगर परिषद आणि तुळजाराम चतुरचंद महाविदयालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ व १५ नोव्हेंबर २०२५ रोजी कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेचे हे ५२ वे वर्ष होते. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहामध्ये पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्याचे डॉ. शैलेद्र देवळाणकर है प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर अध्यक्षस्थानी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शहा (वाघोलीकर) होते. तर सन्माननीय अतिथी म्हणून प्रा.डॉ. देविदास वायदंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य व प्राचार्य मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर हे उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.
पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे यांनी सांगितले कि, व्यक्तिमत्व विकासामध्ये अशा वक्तृत्व स्पर्धाचे योगदान महत्वाचे ठरते. अशा स्पर्धाचे सातत्याने ५१ वर्षापासून नेमके व नेटकेपणाने आयोजन हे महाविद्यालय यशस्वीरित्या करीत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. महाविद्यालयास नॅककडून चौथ्या फेरीत ए ++ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. अविनाश जगताप व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले व महाविद्यालय भविष्यात विद्यापीठ बनेल अशा शुभेच्छा दिल्या.
ते पुढे असेही म्हणाले की, कविवर्य मोरोपंतां सारखे उत्तम साहित्य आपल्या देशात उपलब्ध आहे. अप्रतिम साहित्य, ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे. आपल्या संस्कृतीवर, आपल्या ऐतिहासिक वारशावर आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपली राज्यघटना सक्षम आहे. आपल्या देशाने धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवली आहे. प्रचंड सक्षम फाऊंडेशनवर आपला देश उभा आहे. भारताची अर्थव्यवस्था सक्षम असून जगामध्ये सर्वात जास्त जीडीपी रेट असणारा आपला देश आहे. त्यामुळे मी युवा वगोस आवाहन करतो कि, भारताच्या भविष्याविषयी प्रचंड सकारात्मक राहा. सकारात्मकता व आशावाद ठेवून आपल्या यंग जनरेशनने पुढे गेले पाहिजे. आज परदेश शिक्षणाची क्रेझ निर्माण झाली आहे. जगामध्ये सर्वात उत्तम शिक्षक प्रणाली आपल्याकडे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी याकर आत्मचिंतन, परीक्षण करण्याची वेळ आली आहे. विकसित भरत २०४७ मध्ये प्रचंड महत्व शिक्षण व
शिक्षण व्यवस्थेचे आहे. विकसित भारताकडे प्रवास करीत असताना शिक्षणाबरोबर स्किल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करावे लागेल व ते नवीन शैक्षणिक धोरणाने शक्य होणार आहे. सिमेवर गस्त घालणारा सैनिक व शिक्षक यांची भूमिका खूप महत्वाची आहे असेही ते म्हणाले. मा. संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी महाविद्यालयातील योगा विभाग, सांस्कृतिक विभाग, फुड व डेअरी टेक्नॉलॉजी विभाग इ. अनेक विभागांना भेटी दिल्या व समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणा दरम्यान श्री मिलिंद शहा (वाघोलीकर) यांनी विजेत्यांचे कौतूक केले, तर बक्षीस न मिळालेल्या स्पर्धकांना खचून जाऊ नका, जिद्दीने प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच जिंकाल असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ९१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. राजेंद्र आगवणे, प्रा. मानाजी गावडे, प्रा. मिथुन माने, प्रा. राजकुमार कदम, प्रा.प्रवीण शिंदे, प्रा. स्वामीराज भिसे यांनी कैले, कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले व संस्था व महाविद्यालयाच्या गेल्या ६३ वर्षाच्या प्रगतीचा आलेख मांडला. स्पर्धचे कार्याध्यक्ष प्रा. कृष्णा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या क्रार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेला सढळ हाताने मदत करणारे बक्षीसदातेही यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी पारितोषिकाकरिता रक्कम दिली. प्रा. डॉ. सचिन गाडेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजय शेंडे व प्रा. प्रणित वाबळे यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे-
कनिष्ठ वक्तृत्व
प्रथम क्रमांक चिन्मय सजय कदम, फम्र्युसन महाविद्यालय पुणे
द्वितीय क्रमांक साक्षी राहुल सणस, शारदाबाई पवार महाविदयालय, बारामती
वरिष्ठ गुण वक्तृत्व
प्रथम क्रमांक गागरे नितिन जगन्नाथ, कला वाणिज्य महाविद्यालय, वारजे, पुणे
द्वितीय क्रमांक जावळे शिवानी छाया, संघवी केसरी महाविद्यालय, पुणे
मोरोपंत विषयात प्रथम क्रमांक काणे पूर्वा शिवप्रसाद, सर परशुराम महाविद्यालय, पुणे
वादविवाद स्पर्धा
प्रर्थभक्रमांक न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पारनेरे
स्पर्धक मोहिते आकाश दत्तात्रय आणि उशीर महेश जनार्दन,
द्वितीय क्रमांक – मुंबई विद्यापीठ, मुंबई
स्पर्धक – आळशी अभय कृष्णकांत आणि बर्गे प्रशांत श्रीरंग
उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा
प्रथम क्रमांक वनारे अनिकेत रामा, संताजी महाविद्यालय, नागपूर
द्वितीय क्रमांक-साळुंखे विनायक जयसिंगृधनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय,सातारा प्राचार्य.






