आपला जिल्हा

अजित पवार गटाची पहिली महिला उमेदवार बिनविरोध!

विरोधात एकमेव अर्ज दाखल होता. मात्र या अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केलेलं नसल्यामुळे हा अर्ज बाद ठरवण्यात आला. 

अजित पवार गटाची पहिली महिला उमेदवार बिनविरोध!

विरोधात एकमेव अर्ज दाखल होता. मात्र या अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केलेलं नसल्यामुळे हा अर्ज बाद ठरवण्यात आला.

बारामती वार्तापत्र 

बारामती नगर परिषद निवडणुकीत अजित पवार गटाला पहिला मोठा यशाचा झेंडा मिळाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार अनुप्रेती अक्षय डांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रथमच नशिब आजमावणाऱ्या अनुप्रेती डांगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रतिस्पर्धी पक्षांकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज सादर झाला नाही. त्यामुळे ठरलेल्या अंतिम मुदतीपर्यंत इतर कोणतेही उमेदवार नसल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

या विजयानंतर बारामती शहरात राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाची ही पहिली बिनविरोध विजयाची नोंद असल्याने कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, गुलालाची उधळण करून सेलिब्रेशन केले. आगामी नगर परिषद निवडणुकीत पक्षाला यामुळे मोठा आत्मविश्वास मिळाल्याचे देखील बोलले जात आहे.

स्थानिक पातळीवर अनुप्रेती डांगे यांच्या बिनविरोध निवडीमुळे विकासकामांबाबत अधिक प्रभावी आणि वेगवान कामकाज होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

बारामती नगर परिषदेच्या पुढील राजकीय घडामोडींमध्ये या विजयाचे महत्त्व वाढले असून आगामी निवडणूक लढतींना याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे.

चौकट

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ४२ जागांसाठी ४२ अर्ज, भाजपकडून ३० आणि शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने एकत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप आणि महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

Back to top button