राजकीय

बारामती नगरपालिकेत दुसऱ्या दिवशीही तणावाचे वातावरण; नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या सात उमेदवारांवर आक्षेप

सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

बारामती नगरपालिकेत दुसऱ्या दिवशीही तणावाचे वातावरण; नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या सात उमेदवारांवर आक्षेप

सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी मोठी हालचाल पाहायला मिळाली. सकाळपासूनच नगरपालिका कार्यालय परिसरात उमेदवार, त्यांचे समर्थक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.छाननीसाठी आलेल्या उमेदवारांवर आक्षेप नोंदवण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या एकूण सात उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आले. हे आक्षेप प्रामुख्याने अतिक्रमणाशी संबंधित असल्याचे समजते. संबंधित उमेदवारांनी आपापली बाजू मांडत आक्षेप फेटाळण्याची मागणी केली.

दिवसभर सुरू असलेल्या छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सर्व आक्षेपांचा सविस्तर आढावा घेतला. अखेर तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वच आक्षेप ग्राह्य धरले जाऊ शकत नाहीत, असे स्पष्ट करत सर्व सातही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्व अर्ज अंतिमतः स्वीकारण्यात आले असून या निर्णयानंतर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलासा व्यक्त केला.

छाननी प्रक्रियेच्या तणावातून उमेदवार सुटका झाल्याचे दृश्य संध्याकाळपर्यंत पाहायला मिळाले. आगामी निवडणुकीत आता सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर प्रचाराला वेग येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Back to top button