बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने सोयाबीन व उडीद खरेदी केंद्रा आजपासुन सुरू
एकुण १०० क्विंटल सोयाबीन शेतमाल खरेदी करणेत आला.

बारामती बाजार समिती मध्ये हमीभावाने सोयाबीन व उडीद खरेदी केंद्रा आजपासुन सुरू
एकुण १०० क्विंटल सोयाबीन शेतमाल खरेदी करणेत आला.
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारातील यांत्रिक चाळणीवर सोमवार आज दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीन, उडीद व मुग हमीभाव खरेदी केंद्राची सुरूवात बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व जिल्हा पणन महासंघाचे संचालक राहुल काकडे यांचे उपस्थित झाली.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांची प्रत्यक्षात आज पासुन खरेदी सुरू झाली असुन नोंदणी क्रमांका नुसार शेतक-यांना एसएमएस पाठविणेत येणार आहे.
त्यानंतरच शेतक-यांनी ज्या दिवशी माला आणायला सांगितला आहे त्याच दिवशी आपला सोयाबीन व उडीद, मुग शेतमाल शासनाने दिलेल्या निकषा प्रमाणे खरेदी केंद्रावर आणावयाचा आहे.
शासनाने दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त खरेदी करणेत येईल व शेतक-यांचे पेमेंट आठ दिवसात जमा होईल अशी खात्री पुणे जिल्हा मार्केटींग अधिकारी हनुमंतराव पवार यांनी शेतक-यांना दिली. ऑनलाईन नोंदणी सुरू झाले पासुन आत्ता पर्यन्त सोयाबीन १२० व १७ उडीद शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे अशी माहिती बाबलाल काकडे निरा संघाचे मॅनेजर सुरेश काकडे यांनी दिली. अद्याप मुग विक्रीसाठी एकाही शेतक-याचे नाव नोंदणी केली नाही.
खरेदी केंद्रावर पहिल्या दिवशी ४ शेतक-यांचा एकुण १०० क्विंटल सोयाबीन शेतमाल खरेदी करणेत आला. शेतक-यांची मागणी व मुदतीत जादा खरेदी व्हावी व कोणताही शेतकरी यापासुन वंचित राहु नये यामुळे रविवार या दिवशी ही खरेदी केंद्र सुरू ठेवणेत आले आहे. त्यामुळे शेतक-यांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी यावेळी शेतक-यांना केले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र खलाटे, सदस्य अरूण सकट, देखरेख संघाचे चेअरमन उत्तमराव जगताप, अमोल कदम, प्रशांत मदने, सुर्यकांत मोरे व शेतकरी उपस्थित उपस्थित होते.






