क्राईम रिपोर्ट

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगाव शहरात आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची माहिती समोर आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. नितीन तावरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे.पुढील तपासानंतरच संपूर्ण घटनाक्रमाबाबत स्पष्टता मिळेल,अशी माहिती मिळाली आहे.

तथापि,निवडणुका तोंडावर असताना शहराध्यक्षांवर झालेली ही मारहाण पाहता, या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक स्तरावर निवडणूक वातावरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

सध्या या घटनेबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे आणि नेमके कारण काय, कोणते गट यामध्ये सहभागी असू शकतात याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच संपूर्ण तपशील स्पष्ट होणार आहे.

Back to top button