क्राईम रिपोर्ट

बारामती शहरामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस अटक

एक जीवंत काडतूस

बारामती शहरामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस अटक

एक जीवंत काडतूस

क्राईम;बारामती वार्तापत्र

बारामतीमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीष राऊत, पोलीस अंमलदार अभिजित कांबळे, अमीर शेख, रामचंद्र शिंदे, अक्षय सिताप, दत्तात्रय मदने, सागर जामदार, विशाल शिंदे, गिरीश नेवसे असे पेट्रोलिंग करीत असताना एक इसम संशयीतरित्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूस मिळून आल्याने आरोपी प्रेम दयानंद कांबळे वय १९ वर्षे रा. भोईटे हॉस्पिटलसमोर, इंदापूर रोड, बारामती, ता. बारामती जि.पुणे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे ता.१२/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

अशा प्रकारे बेकायदा घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या लोकांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशे‌ट्टी यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी ही मा. संदिपसिंग गिल साो. (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मा. रमेश चोपडे साो. (अप्पर पोलीस अधिक्षक पुणे), मा. गणेश बिरादार साो. (अप्पर पोलीस अधिक्षक बारामती), मा. सुदर्शन राठोड साो. (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती), मा. श्रीशैल चिवडशेट्टी साो. (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन) यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

दहशत निर्माण करुन वारंवार गुन्हे करणार सराईत गुन्हेगार बारामती शहर पोलीस ठाण्याकडून अटक करून बारामती शहर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील दहशत निमर्ण करणे, मारहाण करणे, खंडणी वसूल करणे असे विविध प्रकारचे गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बिट्टू रमेश जाधव रा. तांदूळवाडी वेस टकार कॉलनी बारामती ता. बारामती जि.पुणे याचेवर आमराई भागातील चित्रपट विभागात काम करणारे अतुल साबळे यांचेवर दहशत निर्माण करुन त्यांना मारहाण केलेबाबत गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदर गुन्हेगार हा गुन्हा घडलेपासून वारंवार आपले ठिकाण बदलून राहत होता. त्याचा वारंवार शोध घेतला परंतू तो बारामती तालुका परिसर, सोलापूर शहर अशी ठिकाणी जावून राहत होता.

ता. १२/११/२०२५ रोजी सदर गुन्हेगार हा त्याचे घरी येणार असल्याची बातमी बारामती शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलीस अंमलदार यांना भेटल्याने त्याचे घराचे जवळ सापळा रचून त्यास कौशल्यपुर्ण रितीने व शिताफीने ताब्यात घेवून अटक केली असून मा. न्यायालयाने त्याची येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. संदिपसिंग गिल साो. (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मा. रमेश चोपडे साो. (अप्पर पोलीस अधिक्षक पुणे), मा. गणेश बिरादार साो. (अप्पर पोलीस अधिक्षक बारामती), मा. सुदर्शन राठोड साो. (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती), मा. श्रीशैल चिवडशेट्टी साो. (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन) यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

Back to top button