बारामतीत राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरुवात.. सचिन सातव आणि सुनिल सस्ते आले एकत्र
भव्य पदयात्रा काढण्यात आली.

बारामतीत राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरुवात.. सचिन सातव आणि सुनिल सस्ते आले एकत्र
माजी गटनेते आणि विरोधी पक्षनेते एकत्र
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात मोठ्या उत्साहात केली.. कसबा परिसरातील ऐतिहासिक काशीविश्वेश्वर मंदिरात पूजा करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला… यानंतर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली..
या पदयात्रेत माजी विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, विशाल हिंगणे, पूनम ज्योतीबा चव्हाण, शर्मिला ढवाण, अल्ताफ सय्यद, राजेंद्र सोनवणे, अश्विनी सातव, प्रतिभा खरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
यंदाच्या निवडणुकीत मोठं राजकीय समीकरण बदललं आहे…उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनिल सस्ते यांच्यात झालेल्या मनोमिलनामुळे, सुनिल सस्ते हे थेट राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या एकत्रीकरणामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराला नवी धार आली असून सस्ते यांच्यासह अन्य विरोधकांनीही अजितदादांशी जुळवून घेतल्यामुळं निवडणुकीचं वातावरण बदलल्याचं चित्र आहे.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी काढण्यात आलेल्या पदयात्रेला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी घेत बारामतीच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचं आवाहन केलं..





