स्थानिक

बारामती रेल्वे स्टेशन ची सुरक्षा राम भरोसे

नूतनीकरण झाले पण सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याबद्दल प्रवाशाकडून आश्चर्य व्यक्त

बारामती रेल्वे स्टेशन ची सुरक्षा राम भरोसे

नूतनीकरण झाले पण सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याबद्दल प्रवाशाकडून आश्चर्य व्यक्त

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील रेल्वे स्टेशन चे नुकतेच नूतनीकरण व सुशोभिकरण झाले परंतु रेल्वे स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने दररोज च्या हजारो प्रवाश्याची सुरक्षा राम भरोसे आहे .

पूर्वी सुद्धा कॅमेरे नव्हते व आता सुद्धा नूतनीकरण व सुशोभिकरण होऊन सुद्धा कॅमेरे नाहीत या बाबत प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रवेशद्वार, पार्किंग, मुख्य स्टेशन भाग, रेल्वे प्लॅटफॉर्म, कार्यालय,प्रवासी वैटिंग कक्ष ,आरक्षण कक्ष आदी ठिकाणी कोठेच कॅमेरे नाहीत.या पूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत या मध्ये प्रवाशांची रोकड ,दागिने व पार्किंग मधील वाहने चोरीला गेलेली आहेत. बारामती रेल्वेस्टेशन वर पॅसेंजर चार रेल्वे गाड्या येतात व परत दौंड कडे जातात या वेळी ३ ते ४ हजार प्रवासी येतात जातात त्यांच्या मौल्यवान वस्तू सामान, पार्किंग मधील गाड्या व इतर ठिकाणी तात्पुरत्या पार्किंग केलेली वाहने आदी वस्तू असतात किंवा पोलिसांना हवे असलेले संशयास्पद व्यक्ती असतात कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशी मागणी प्रवासी करत आहेत .

खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे स्टेशन या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा या सुद्धा सूचना प्रशासनाला केलेल्या होत्या तरी अद्याप पर्यंत कॅमेरे का बसविले जात नाहीत याबाबत उलट सुलट चर्चा प्रवाशांमध्ये आहे.

चौकट:
प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व स्टेशन आवारात इतरत्र वाहने पार्किंग केलेली असताना त्यामधील सुट्टे भाग चोरीला जातात व कधी कधी वाहने चोरीला जातात या मध्ये चोरी करणाऱ्या व्यक्तीस सहकार्य व्याहवे म्हणून प्रशासन यंत्रणा रेल्वे स्टेशन व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवत नसावेत महेश शिंदे बारामती ते पुणे दररोज प्रवास करणारे प्रवासी.

चौकट:
दिल्ली बॉम्बस्फोट व इतर ठिकाणचे अतिरेकी हल्ले होऊ नये याची दक्षता म्हणून व चोरीच्या घटना होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवा याचे निवेदन रेल्वे मंत्री यांना देणार दादासाहेब भिंताडे कार्याध्यक्ष: प्रवासी वाहतूक सेवा संघटना बारामती तालुका

Back to top button