बारामतीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा धडाका; श्रीराम मंदिरात नारळ फोडत परिसरात उमेदवारांची पदयात्रा
प्रभाग क्र. २० च्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली

बारामतीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा धडाका; श्रीराम मंदिरात नारळ फोडत परिसरात उमेदवारांची पदयात्रा
प्रभाग क्र. २० च्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या निवडणूक रणधूमाळीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी काल काशीविश्वेश्वर मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर विविध प्रभागातही प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे. आज बारामती शहरातील श्रीराम गल्ली येथील श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रभाग क्र. २० च्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभागातून पदयात्रा काढून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सचिन सातव यांना राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार जाहीर केली आहे. प्रशासकीय कामाबरोबरच विविध संस्थांवरील कामांचा अनुभव असलेल्या सचिन सातव यांनी कालपासूनच स्वत:सह सहकारी उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात केली आहे.
आज शहरातील विविध प्रभागांमध्ये सचिन सातव यांनी प्रचाराचा नारळ फोडत मतदारांच्या भेटी घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केला.
श्रीराम गल्ली येथील श्रीराम मंदिरात प्रभाग क्र. २० मधील उमेदवार प्रथमेश गालिंदे, दर्शना तांबे, आफरीन बागवान यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगरसेवक विक्रांत तांबे, संग्राम तांबे, अॅड. मकरंद देवळे, किशोर देवळे आणि देवळे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी परिसरातून पदयात्रा काढून मतदारांना आवाहन करण्यात आले.






