एकीकडं ‘बिनविरोध पॅटर्न’ची चर्चा, तर दुसरीकडे बारामतीत युगेंद्र पवारांचे अजित पवारांवर गंभीर आरोप;शरद पवारांचे 4 उमेदवार 20 – 20 लाख रुपये देऊन फोडले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेकेदारांची गर्दी आहे

एकीकडं ‘बिनविरोध पॅटर्न’ची चर्चा, तर दुसरीकडे बारामतीत युगेंद्र पवारांचे अजित पवारांवर गंभीर आरोप;शरद पवारांचे 4 उमेदवार 20 – 20 लाख रुपये देऊन फोडले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेकेदारांची गर्दी आहे
बारामती वार्तापत्र
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ शरद पवारांच्या कुटुंबात नगरपरिषदा निवडणुकीवरूनही संघर्ष उडाला. विधानसभेला अजित पवारांची टक्कर घेणाऱ्या युगेंद्र पवार यांनी अजितदादांवर पैसे देऊन आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याचा आरोप केला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात युगेंद्र पवारांनी आज बारामती पदयात्रा काढून केली. त्यांनी आपल्याबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन बारामतीच्या विविध वार्डांमध्ये प्रचार केला.
अजित पवारांनी बारामती नगरपरिषदेतले आठ उमेदवार बिनविरोध निवडून आणून त्यांना नगरसेवक केले. ते बिनविरोध कसे झाले याचा धक्कादायक खुलासा युगेंद्र पवार यांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार 20 20 लाख रुपये देऊन फोडले त्यांना माघार घ्यायला लावली उरलेल्या चार उमेदवारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणला.
त्या मध्ये भाजपचे सुद्धा उमेदवार होते. हे सगळे सामान्य घरातले उमेदवार होते. परंतु, त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी माघार घ्यायला लावून आठ उमेदवार बिनविरोध निवडून आणले, असा आरोप युगेंद्र पवार यांनी केला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेकेदारांची गर्दी आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वसामान्यांची गर्दी आहे असा दावाही युगेंद्र पवार यांनी केला.
मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा कारनामा जाहीरपणे सांगून सुद्धा युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कुठलीही तक्रार करण्याची बात केली नाही.






