स्थानिक

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी बारामतीतील नागरिकांचां रोष?समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप!

तक्रारींची कोणीही दखल घेत नाही.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी बारामतीतील नागरिकांचां रोष?समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप!

तक्रारींची कोणीही दखल घेत नाही.

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गुणवडी रोड परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक पातळीवर अनेक मूलभूत सुविधा ठप्प असून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक नाराज आहेत.सध्या सुरू असलेल्या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी नागरिक त्या ठिकाणी असलेल्या अडचणींचा पाढा वाचत आहेत. तसेच आमच्या तक्रारींची कोणीही दखल घेत नाही. निवडणूक झाल्यानंतर कोणीही फिरकत नाही.

स्ट्रीटलाईटचे खांब उभारले… पण लाईट मात्र बंद

बारामती शहरात स्ट्रीट लाईटचे खांब बसवले असले तरी लाईट अद्याप चालू करण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अपूर्ण साईड पट्टे व अडकलेले ड्रेनेज

शहरात रस्त्यालगतचे साईड पट्टे भरून न दिल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.शिवाय ड्रेनेजची लाईन वारंवार ओसंडून वाहत आहे. त्यातून वाहणारे पाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी व डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Back to top button