इंदापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 3 मध्ये घड्याळाची जोरदार चर्चा ; अपक्ष उमेदवाराची दमछाक
हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला समजला जाणारा प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादीच्या गोठ्यात जाण्याची दाट शक्यता??

इंदापूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 3 मध्ये घड्याळाची जोरदार चर्चा ; अपक्ष उमेदवाराची दमछाक
हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला समजला जाणारा प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादीच्या गोठ्यात जाण्याची दाट शक्यता??
इंदापूर :
इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार गणेश पाटील, कृष्णा भिमा विकास आघाडीचे उमेदवार गणेश राऊत, आणि अपक्ष उमेदवार शेखर पाटील यांच्यात (३ अ) या जागेसाठी सरळ लढत होत आहे. तर (३ ब) या जागेसाठी राष्ट्रवादीच्या वंदना शिदे, कृष्णा भिमा विकास आघाडीच्या पुष्पा शिंदे, आणी अपक्ष म्हणुन मनिषा शिंदे यांच्यात सरळ तिरंगी लढत होत असुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश पाटील व वंदना शिंदे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे. नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही गटानी यावेळी सर्वाधिक नवख्या व युवा उमेदवारांना संधी दिल्याचे दिसुन येत आहे. सध्या वार्ड निहाय प्रचार सुरू आहे.

परंतु अपक्ष व आघाडीतील उमेदवारांना अद्याप अधिकृत चिन्ह मिळाले नसून त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश पाटील व वंदना शिंदे यांनी मतदाराच्या घरोघरी जावुन भेटी गाठीचा प्रचार जोरदार सुरू आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये गणेश पाटील व वंदना शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन त्यांनी प्रभागातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देवुन मतदारांशी संपर्क साधला आहे. गणेश पाटील व वंदना शिंदे हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुक लढवत असुन हे दोघेही नवखे उमेदवार असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे.






