तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास उपविजेतेपद
संघातील सौमिल गायकवाड याची शालेय राष्ट्रीय नेट पॉइंट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेली आहे

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास उपविजेतेपद
संघातील सौमिल गायकवाड याची शालेय राष्ट्रीय नेट पॉइंट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया आयोजित शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 26 मधील राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा गोंदिया येथे दिनांक 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 25 दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या 19 वर्ष वयोगटातील संघांनी यश प्राप्त केले.
नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल गोंदियाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तर नेटवर्क स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलींच्या संघातील गौरी पानबुडे, प्रांजल यादव, पायल लोंढे, अनुजा जाधव, वैष्णवी सूर्यवंशी, पायल लव्हे, साक्षी करे, पूजा मोरे, अपर्णा कुंभार व वैष्णवी रिटे यांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत या राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले.
तसेच मुलांच्या संघातील स्वरम जाधव सोमील गायकवाड, शुभम गोफणे, सोहम चव्हाण , अनिरुद्ध गुळवे, आदित्य थोरात, सार्थक विचकुले, शंभूराज इंगळे, समर्थ गुरव, सनी शहा, यशराज जगताप, समाधान पवार यांनी सांघिक खेळाच्या जोरावर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या संघातील सौमिल गायकवाड याची शालेय राष्ट्रीय नेट पॉइंट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेली आहे या खेळाडूंना डॉ. गौतम जाधव व प्रा. अशोक देवकर प्राध्यापिका ज्योती उदावंत व सुहास डेरे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर, सचिव मिलिंद शहा वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.






