जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत जनहित विद्यालयाच्या मुलींची बाजी
खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळ करून विजय संपादित
जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत जनहित विद्यालयाच्या मुलींची बाजी
खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळ करून विजय संपादित
बारामती वार्तापत्र
आज दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठान विद्यालयाच्या १७ वर्ष व १४ वर्ष वयोगटाच्या मुलींच्या दोन्ही संघांनी तृतीय क्रमांक मिळवला. सर्व खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळ करून विजय संपादित केला .
सर्व खेळाडूंचे खेळाडूंच्या पालकांचे व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे व श्री. अजिंक्य साळी या सर्वांचे विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.






