बारामतीत नगरपालिका निवडणूक, कोर्टाच्या आदेशाने माजी नगरसेवक सतीश फाळके पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात!
सत्र न्यायालयाने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजाची तपशीलवार पाहणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला फाळके यांचा अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले.

बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद निवडणुकीत आज अनपेक्षित पण महत्त्वपूर्ण राजकीय कलाटणी पाहायला मिळाली. अर्ज नामंजूर झाल्यानंतर थेट कोर्टात गेलेल्या भाजपाचे इच्छुक उमेदवार सतीश फाळके यांना कोर्टाने दिलासा दिला आणि आज त्यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला.
सतीश फाळके यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या अर्जाची कागदपत्रांची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत सुपूर्त न झाल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. या निर्णयाचा फाळके यांनी तसेच दोन अपक्ष उमेदवारांनी जोरदार विरोध करत थेट बारामतीच्या सेशन कोर्टात धाव घेतली.
सत्र न्यायालयाने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजाची तपशीलवार पाहणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला फाळके यांचा अर्ज स्विकारण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशानंतर आज अखेर सतीश फाळके यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. फाळके यांच्यासह दोघा अपक्षांनीही आपले अर्ज पुन्हा दाखल केल्याने बारामतीतील निवडणूक समीकरणांमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. आता फाळके पुन्हा मैदानात उतरले आहेत.