क्राईम रिपोर्ट
निवडणुकीच्या तोंडावर बारामती शहरात बलात्काराचा गुन्हा दाखल.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

निवडणुकीच्या तोंडावर बारामती शहरात बलात्काराचा गुन्हा दाखल.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सतरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा आरोपी बारामतीतील त्या आरोपीचे लग्न झाले असून अल्पवयीन मुलगी सासवड येथील आहे.बारामतीतील एका नामवंत सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला असून अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.या घटनेने बारामतीत नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खळबळ उडाली आहे.






