बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन.. शहरातील मुख्य बाजारपेठेतून काढली पदयात्रा..
प्रभाग क्र. १५, १६, १७, १८, १९ व २० मधील उमेदवारांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन

बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन.. शहरातील मुख्य बाजारपेठेतून काढली पदयात्रा..
प्रभाग क्र. १५, १६, १७, १८, १९ व २० मधील उमेदवारांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आज राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह प्रभाग क्र. १५, १६, १७, १८, १९ व २० मधील उमेदवारांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत शहरातील मुख्य बाजारपेठेतून पदयात्रा काढली. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं..
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह प्रभाग क्र. १५ तील उमेदवार मंगल किर्वे, जितेंद्र गुजर, प्रभाग क्र.१६ तील उमेदवार गोरख पारसे, मंगल जगताप, प्रभाग क्र. १७ मधील उमेदवार अल्ताफ सय्यद, प्रभाग क्र. १८ चे उमेदवार राजेंद्र सोनवणे, प्रभाग क्र. १९ मधील उमेदवार प्रतिभा खरात, सुनिल सस्ते, प्रभाग क्र. २० मधील उमेदवार प्रथमेश गालिंदे, दर्शना तांबे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली.
बारामती शहरातील मुजावरवाडा येथून गुनवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक, सुभाष चौक, गांधी चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली.. पदयात्रेचं नागरीकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. बारामतीच्या विकासाला अधिकची गती देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं..






