राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने केली अपक्ष उमेदवार विजयाची सोशल मीडियावर पोस्ट
प्रभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे.

राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने केली अपक्ष उमेदवार विजयाची सोशल मीडियावर पोस्ट
प्रभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण निवडणुकीची धुरा ज्येष्ठ नेत्यांच्या हाती दिल्याने त्यांच्याच भावाला प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने एका अपक्ष उमेदवाराच्या बाजूने “तूच रे विजय” अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ही पोस्ट म्हणजे पक्षातील नाराजीचे प्रतिबिंब असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
प्रभाग क्र. 15 मधील ज्यांच्याबाबत चर्चा सुरु आहे ते अपक्ष उमेदवार म्हणजे माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल सुनील पोटे. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे या प्रभागातील लढत चुरशीची होण्याचे संकेत आधीपासूनच होते; परंतु माजी नगरसेवकाच्या पोस्टमुळे ही लढत आणखी रंगतदार झाली आहे.
बारामतीत आता सर्वस्तरांत एकच चर्चा—
प्रभाग 15 मध्ये नेमका कोणता निकाल लागणार?पक्षातील अंतर्गत कुरबुरीमुळे काही वेगळे समीकरण निर्माण होणार का?अजित पवार या परिस्थितीकडे कसे पाहतातशेवटच्या सभेत ते काय भूमिका मांडणार?या अनेक प्रश्नांनी बारामतीत राजकीय तापमान अधिक चढले आहे. निवडणूक जवळ येत असताना या प्रभागातील घडामोडी संपूर्ण शहरात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरत आहेत.






