वानेवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत कार्यक्रम संपन्न
ऊस पाचट व्यवस्थापनाचे क्षेत्र वाढलेले आहे.

वानेवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत कार्यक्रम संपन्न
ऊस पाचट व्यवस्थापनाचे क्षेत्र वाढलेले आहे.
बारामती वार्तापत्र
शेतकरी ऊस पाचट व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करता यावे याकरिता वानेवाडी येथे निखिल भोसले यांच्या क्षेत्रावर ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रियांका मदने, मंडळ कृषी अधिकारी अप्पासाहेब झंजे, उप कृषी अधिकारी प्रवीण माने, सहाय्यक कृषी अधिकरी रणजित धुमाळ व शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यात विभागाच्यावतीने मागील 3 ते 4 वर्षापासून ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे ऊस पाचट व्यवस्थापनाचे क्षेत्र वाढलेले आहे. आणि तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जात आहे.
श्री. हाके यांनी पाचट व्यवस्थापन करताना पाचटाचे लहान तुकडे, पाचट कुट्टी मशीनच्या सहाय्याने करून घ्यावेत, पाचट सरिमध्ये घ्यावे, त्यावर हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सुपर फॉस्फेट व 10 किलो/लिटर पाचट कुजवीणारे जिवाणू, एकसारखे द्यावे त्यानंतर पाणी द्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच ऊस पाचट व्यवस्थापणामुळे होणारे लाभ, जमिनीतील सेंद्रीय कर्ब, जलधारण क्षमतेमध्ये वाढ, तणव्यवस्थापन, मजूरी खर्चातील बचत आदी बाबी विषद केल्या.






