स्थानिक

बिबट्याचा व्हिडिओ AI द्वारे प्रसिद्ध झाल्याचे वनविभागाचे प्रसिद्धीपत्रक

बिबट्या असलेची कोणतीही चिन्हे ( पाऊलखुणा) आढळून आल्या नाहीत.

बिबट्याचा व्हिडिओ AI द्वारे प्रसिद्ध झाल्याचे वनविभागाचे प्रसिद्धीपत्रक

बिबट्या असलेची कोणतीही चिन्हे ( पाऊलखुणा) आढळून आल्या नाहीत.

बारामती वार्तापत्र 

बारामतीमध्ये बिबट्याच्या व्हिडिओ काल सोशल मीडियावरील व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

त्यामध्ये गुरुवार दिनांक. 27.11.2025 रोजी बारामती येथील कसबा भागातील शिंदे पार्क परिसरातून ऊसाच्या शेतात बिबट्या दिसल्याची सोशल मिडियाद्वारे प्रसारित झालेची बातमी सोबत बिबट या वन्यप्राण्याचा शेतात असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.

सदर बातमी वनविभागाचे सायंकाळी 5.20 वा. निदर्शनास आली. सदर प्रसिद्ध झालेल्या बातमी नुसार तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे वनविभाग कार्यालयाशी संपर्क केलेचे अनुषंगाने बारामती वनविभागाची टिम तसेच रेस्क्यु टीम यांनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी केली.

त्याठिकाणी बिबट्या असलेची कोणतीही चिन्हे ( पाऊलखुणा) आढळून आल्या नाहीत. तेथील स्थानिक नागरिकांबरोबर याबाबत चर्चा केली व सूचना दिल्या व सदर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राची पडताळणी केली असता ते Al Generated द्वारा असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच शुक्रवार दिनांक 28.11.2025 रोजी बारामती येथील रिंग रोड येथे माजी नगरसेवक श्री. आबा बनकर यांच्या बंगल्याशेजारी बिबट्या आढळून आलेची सोशल मिडियाद्वारे प्रसारित झालेची बातमी वनविभागाचे निदर्शनास आली. तसेच सदर बातमी नुसार परिसरातील स्थानिक नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे वनविभाग कार्यालयाशी संपर्क केलेचे अनुषंगाने बारामती वनविभागाची टिम तसेच रेस्क्यु टीम यांनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी केली.

त्याठिकाणी बिबट्या असलेची कोणतीही चिन्हे ( पाऊलखुणा) आढळून आल्या नाहीत. तेथील स्थानिक नागरिकांबरोबर याबाबत चर्चा केली व सूचना दिल्या. व सदर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राची पडताळणी केली असता ते AI Generated द्वारा असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार वनविभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अफवा किंवा बनावट छायाचित्र पसरवू नये किंवा ते सोशल मिडीयावर फॉरवर्ड करू नये. याबाबत लोकांना सूचना दिल्या.

अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं……..? बिबट्या जवळ असल्यास ओरडतच हळूहळू मागे सरका. बिबट्या दूर असल्यास शांतपणे हात वर करून मागे हटा.त्याला पळून जाण्याचा मार्ग द्या.
घाबरू नका.

धावत सुटू नका किंवा पाठ फिरवू नका.बिबट्याचा वावर असणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनी खालील दक्षता घ्यावी :१. घराभोवती भरपूर प्रकाश पडेल असा लाईट असावा.२. घराजवळ स्वच्छता असावी.

उदा: केर कचरा, झाडे झुडपे घराजवळ नसावीत.३. शाळेत जाताना किंवा येताना ऊसशेती, बागायती शेती जवळील रस्ते वापरायचे असल्यास समुहाने तसेच आवाज करत, मोठ्या व्यक्तीसोबत जावे.४. घराला किंवा पाळीव प्राण्यांच्या गोठ्याला १५ फुटाची जाळीचे कंपाउंड म्हणजेच बंदिस्त गोठे करावे.५. शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचास जाणे टाळावे.६. बिबट्या दिसल्यास जोरात आरडाओरडा करावा. बिबट मनुष्यवस्ती जवळ दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये.७.एखादा बिबट विहिरीत पडला असेल, अथवा जखमी अवस्थेत, ऊसतोडी दरम्यान पिल्ले सापडल्यास वनविभाग अथवा RESQ टीमला कळवावे.

हेल्पलाईन नंबरः-1) वनविभाग हेल्पलाईन नंबर: 19262) Resq Team बारामती :-7387771050

Back to top button