राजकीय

बारामती नगरपालिका निवडणूक : प्रभाग १५ मध्ये ‘या’ दोन विषयांवरून पेटलेले राजकारण शांत होणार का..?

मारुती मंदिर हटवले जाणार नाही

बारामती नगरपालिका निवडणूक : प्रभाग १५ मध्ये ‘या’ दोन विषयांवरून पेटलेले राजकारण शांत होणार का..?

मारुती मंदिर हटवले जाणार नाही

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. नेहमीप्रमाणे पक्षीय उमेदवारांसोबतच यावेळी काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रभाग क्रमांक १५मध्ये विशेष लक्ष वेधून घेणारे वेगळे राजकारण पाहायला मिळत आहे.

या प्रभागात असलेलं मारुती मंदिर आणि ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या बाजारपेठेवरुन येथील राजकारण पेटलं आहे. अशातच या दोन्ही विषयांवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

त्यामुळं प्रभाग क्र. १५ मध्ये पेटलेलं राजकारण शांत होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मारुती मंदिर हटवण्याच्या चर्चेने राजकारणाला सुरुवात
गेल्या काही महिन्यांपासून भिगवण चौकातील मारुती मंदिर हटवण्यात येणार असल्याच्या चर्चेला अचानक उधाण आले.ही चर्चा बाहेर येताच स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला.

या मुद्द्यावरून अनेक दिवस मोर्चे, आंदोलनं, निवेदने आणि बैठका घेण्यात आल्या.मंदिर हटवू नये अशी मागणी तीव्र होत गेली.या वादात राज्याचे उपमुख्यमंत्रीही उतरले आणि त्यांनी यासंबंधी टिप्पणी केल्याने हा मुद्दा अधिकच राजकीय रंगात रंगला.

निवडणुकीत मंदिराचा मुद्दा प्रभावी या पार्श्वभूमीवर आता बारामती नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ची निवडणूक हा मंदिराच्या मुद्द्यावरच फिरताना दिसत आहे. व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिक याचा विशेष परिणाम जाणवत असून काल झालेल्या बारामती व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या प्रश्नावर थेट भूमिका मांडली.

मारुती मंदिर हटवले जाणार नाही असं सांगतानाच ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या जागेवरूनही त्यांनी भाष्य केले. कोणत्याही व्यावसायिकाला त्रासदायक ठरेल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रभागातील पेटलेलं राजकारण शांत होतंय का याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
याचदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बारामतीत जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत ते मारुती मंदिर प्रकरणावर काय भूमिका मांडतात, याची उत्सुकता नागरिकांमध्ये प्रचंड वाढली आहे.

चौकट
व्यापाऱ्यांमध्ये काही गोष्टी पसरवल्या जात आहेत. ९९ वर्षाच्या करार असलेल्या प्लॉट काढून घेतली जातील आणि त्यात किरण गुजर यांचा मोठा हात आहे. माझा प्लॉट आहे का असा सवाल करून किरण गुजर यांनी चाळीस वर्षांमध्ये आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, अजित दादांनीही केलं नाही व किरण गुजरने देखील केलं नाही असं स्पष्ट केलं. खोटं बोलून लोकांची दिशाभूल कशासाठी करता असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Back to top button