स्थानिक

व्ही आर बॉयलर चा जागतिक प्रदर्शनात सहभाग

व्ही आर बॉयलर च्या स्टॉला तज्ञांच्या भेटी

व्ही आर बॉयलर चा जागतिक प्रदर्शनात सहभाग

व्ही आर बॉयलर च्या स्टॉला तज्ञांच्या भेटी

बारामती वार्तापत्र 

बारामती एमआयडीसी येथील व्ही आर बॉयलर ने थायलंड येथे झालेल्या बॉयलर वर्ल्ड एक्झिबिशन मध्ये सहभाग घेऊन बॉयलर क्षेत्रातील अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञान व भविष्यातील बॉयलर कसा असेल व त्याचे फायदे या विषयावर सादरीकरण केले.

१९ नोव्हेंबर रोजी थायलंड चे मंत्री प्रिपेन स्लोरीथकवन यांच्या हस्ते प्रदर्शन चा उदघाटन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी बाष्पके संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक डी. पी. अंतरापुरकर व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार ,यशवंतराया उद्योग समूहाचे चेअरमन प्रवीण जगताप, सुहास शिंदे, व चे व्ही आर बॉयलर चे संचालक राजाराम सातपुते,मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सातपुते व अधिकारी कर्मचारी आणि विविध देशातील प्रतिनिधी उपस्तीत होते.

या प्रदर्शनात कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध क्षमतेचे बॉयलर मॉडेल्स, इंडस्ट्रियल स्टीम सोल्यूशन्स तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार तयार केलेली उपकरणे यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे स्टॉल क्रमांक १०८ हे एक्झिबिशनमधील आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरले.

कार्यक्रमादरम्यान अमेरिका,जर्मनी, जपान, कोरिया, कॅनडा आदी अनेक उद्योग क्षेत्रातील मान्यवर, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी स्टॉलला भेट देत उत्पादनांची माहिती घेतली. कंपनीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांची, तंत्रज्ञानातील नवकल्पनांची आणि उत्कृष्ट सेवांची सर्व उपस्थितांनी मनापासून प्रशंसा केली.

उद्योग क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण, सुरक्षित आणि ऊर्जा-बचतीचे सोल्यूशन्स देण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, भविष्यातही जागतिक पातळीवरील अशा महत्त्वाच्या प्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची कंपनीची बांधिलकी असून नवीन व अत्याधुनिक तंत्रज्ञान च्या जोरावर बॉयलर क्षेत्रात क्रांती घडवणार असल्याचे व्ही आर बॉयलर चे चेअरमन राजाराम सातपुते यांनी सांगितले.

चौकट:
बारामती मध्ये बॉयलर क्षेत्रात जगाला पुरवेल असे अत्याधुनिक व नवीन तंत्रज्ञान तेही जागतिक किमतीच्या तुलनेत अगदी कमी बजेट मध्ये बनवून दिले जाते हे थायलंड मधील प्रदर्शन मुळे कळले व आमच्या कंपनी साठी नवीन बॉयलर बुकिंग केले.

थॉमसन डिसुझा संग बॉयलर प्रा ली कंबोडिया

 

Back to top button