दुर्दैवी घटना;देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; बारामतीतील दांपत्याचा जागीच मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी
अकाली जाण्याने बारामतीतील त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला

दुर्दैवी घटना;देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; बारामतीतील दांपत्याचा जागीच मृत्यू; दोन मुले गंभीर जखमी
अकाली जाण्याने बारामतीतील त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात एका दु:खद घटनेने शोकाकूल वातावरण पसरले. येथे देवदर्शनाहून परत येताना कर्नाटक राज्यातील हुबळीनजिक झालेल्या अपघातात बारामतीतील दाम्पत्यांचा दुर्देवी अंत झाला.
गेल्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात असताना चारचाकी कार आणि ट्रकची धडक होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता तिरुपती दर्शनावरुन येताना पती-पत्नीच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.
बारामती शहरातील हे दाम्पत्य तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते, मात्र दर्शनाहून परत येताना झालेल्या कार अपघातात पती अनिल जगताप यांच्यासह कारमधील आणखी एकाचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत.
बारामतीतील शिवाजी नगर येथील जगताप कुटुंबीय बालाजीच्या देवदर्शनासाठी गेले होते. तिरुपतीवरुन दर्शन घेऊन परतत असताना आज पहाटे साडेचार वाजता हुबळी राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांच्या चारचाकीची वाहनाची पुढील ट्रकला धडक बसली.
त्यामध्ये अनिल जगताप हे जागीच मृत पावले तर, त्यांच्या दोन्ही मुलांना मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हे कुटुंब आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांना भीषण अपघातात झाला. ज्यामध्ये जगताप कुटुंबातील पती-पत्नीचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलंही होती. जे जखमी झाले आहेत.
बारामती येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रिजमध्ये कार्यरत असलेले अनिल सदाशिव जगताप (वय 50) आणि त्यांची पत्नी वैशाली अनिल जगताप (वय 45) अशी मृत दांपत्याची नावं आहेत. तर, त्यांचा मुलगा अथर्व (वय 24) आणि मुलगी अक्षता (वय 20) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जगताप कुटुंब शनिवारी (29 नोव्हेंबर) बारामतीहून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बुधवारी (3 डिसेंबर) पहाटे साडेचार वाजता परतत असताना कर्नाटकातील हुबळी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. पुढे जाणाऱ्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावता आणि जगताप यांचे चारचाकी वाहन मागून त्या ट्रकला जाऊन जोरदार धडकलं आणि गाडीचा चक्काचूर झाला.
या अपघातात अनिल जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी वैशाली जगताप गंभीर जखमी होत्या. त्यांना तातडीने हुबळी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अपघातात त्यांची दोन्ही मुलं जखमी झाली असून, सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच गाडीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगाही होता, सुदैवाने त्यालाही फारशी दुखापत झाली नाही. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल जगताप व वैशाली जगताप हे दांपत्य अत्यंत मनमिळावू होते. त्यांच्या अकाली जाण्याने बारामतीतील त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. दरम्यान गुरुवारी (4 डिसेंबर) सकाळी बारामतीत या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली आहे.






