राजकीय

बारामतीत प्रचाराला पुन्हा सुरुवात; सचिन सातव पहाटेच पोहोचले जळोचीच्या उपबाजारात..!

व्यापारी व शेतकरी यांच्या भेटीगाठी

बारामतीत प्रचाराला पुन्हा सुरुवात; सचिन सातव पहाटेच पोहोचले जळोचीच्या उपबाजारात..!

व्यापारी व शेतकरी यांच्या भेटीगाठी

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषदेची निवडणुक लांबणीवर पडल्यामुळं काही दिवस प्रचार थंडावला होता. मात्र आज राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी सकाळी ६ वाजताच जळोची येथील बाजार समितीच्या भाजी मंडईत जाऊन भाजीविक्रेते, व्यापारी व शेतकरी यांच्या भेटीगाठी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले

. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत नगरपरिषदेकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करणारा पक्ष आहे.. त्यामुळं जळोची बाजार समिती आवारात अनेक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

भविष्यातही सामान्य शेतकरी, व्यापारी आणि विक्रेत्यांना कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही सचिन सातव यांनी यावेळी दिली..

Back to top button