स्थानिक

बारामतीतील विश्वासनगरमध्ये दत्त जयंतीला विद्युत रोषणाईची अनोखी लखलख

सुमारे साडेतीन ते चार हजार रहिवासी

बारामतीतील विश्वासनगरमध्ये दत्त जयंतीला विद्युत रोषणाईची अनोखी लखलख

सुमारे साडेतीन ते चार हजार रहिवासी

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील गुणवडी रोडवरील विश्वास नगर परिसरात गेली पंधरा वर्षे पारंपरिक पद्धतीने दत्त जयंती उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या वर्षीच्या उत्सवात विशेष आकर्षण ठरली ती भव्य विद्युत रोषणाई. दिवाळीपासून बारामतीत विविध ठिकाणी सजावट आणि रोषणाईचे ट्रेंड जोरात असून, त्याच धर्तीवर यावर्षी विश्वास नगरमध्येही वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विश्वास नगरमधील माजी नगरसेवक विक्रांत तांबे यांच्या येथील सोसायटीमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे साडेतीन ते चार हजार रहिवासी असलेल्या या विस्तीर्ण परिसरात दत्त जयंती पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

उत्सवाच्या दिवशी दत्त जन्मोत्सवाबरोबरच नागरिकांसाठी प्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रसादाचा लाभ घेतला आणि उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भव्य रोषणाई, धार्मिक कार्यक्रम, प्रसाद व्यवस्था आणि परिसरातील नागरिकांचा उत्साह यामुळे यंदाची दत्त जयंती विश्वासनगरमध्ये विशेष लक्षवेधी ठरली.

Back to top button