‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
महत्त्व आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन

‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
महत्त्व आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.
यावेळी आत्मा प्रकल्प संचालक सुरज मडके, तालुका कृषि अधिकारी सचिन हाके, सर्व मंडळ कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गणेश जाधव यांच्यासह तालुक्यातील निवड केलेले शेतकरी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक मयुर साळुंखे व श्रीमती वर्षाराणी कदम यांनी फार्मर कप स्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी मृदा आरोग्य, त्याचे महत्त्व आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.






