शैक्षणिक

 तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) विभागात एकदिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 

कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

 तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) विभागात एकदिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 

कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

बारामती वार्तापत्र,

तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या बीबीए (सीए) विभाग आणि उद्योजकता विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “ASP.NET Web Application Development” या विषयावर एक दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप व वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ.निरंजन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेची सुरुवात प्रा.स्मिता कचरे यांच्या भाषणाने झाली, तर प्रा.दत्तात्रय आरडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून दत्तात्रय कोळेकर (Cognizant Pvt. Ltd., Pune), वैभव वाघमोडे (LTI Mindtree Ltd., Pune) आणि सौरभ राऊत (EY Technology, Pune) यांनी विद्यार्थ्यांना ASP.NET वेब अँप्लिकेशन विकासाच्या विविध तांत्रिक घटकांवर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत TYBBA(C.A.) वर्गातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि वेब विकासाचे प्रशिक्षण घेतले. ही कार्यशाळा विभागप्रमुख प्रा.सलमा शेख आणि उद्योजकता विकास कक्ष प्रमुख प्रा.प्राजक्ता कुलकर्णी, कार्यशाळा संयोजक प्रा.दत्तात्रय आरडे,  प्रा.तृप्ती भोसले यांच्या प्रयत्नांतून यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.

शेवटी प्रा.अश्विनी भोसले यांनी सर्व मान्यवर, विद्यार्थ्यांचे आणि आयोजनातील सहकार्यांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

Back to top button