बारामतीच्या प्रभारी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे सव्वाचार कोटींची संपत्ती; ७० हजारांची लाच घेताना पकडल्यावर धक्कादायक उघड
घरझडतीत ४ कोटी २५ लाखांचा ऐश्वर्यसंपन्न मुद्देमाल

बारामतीच्या प्रभारी राहिलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे सव्वाचार कोटींची संपत्ती; ७० हजारांची लाच घेताना पकडल्यावर धक्कादायक संपत्ती उघड
घरझडतीत ४ कोटी २५ लाखांचा ऐश्वर्यसंपन्न मुद्देमाल
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये काही वर्षे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र सदाशिव केसकर या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्या अवाजवी संपत्तीचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या अधिकाऱ्यावर गुरुवारी (दि. ४) कारवाई केली.
लाच घेताना रंगेहात पकड
तक्रारदाराला परराज्यातील जेसीबीचे पासिंग करण्यासाठी ७०,००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.ही मागणी राजेंद्र केसकर यांनी आपल्या ओळखीच्या खासगी व्यक्ती राजेश रामनिवास माहेश्वरी (वय ५७, रामनगर) यांच्या माध्यमातून केली होती.तक्रारदाराने याची तक्रार नोंदवल्यानंतर ACB नागपूरने सापळा रचून दोघांनाही लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
घरझडतीत ४ कोटी २५ लाखांचा ऐश्वर्यसंपन्न मुद्देमाल
अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर ACB ने पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या छाप्यात खालीलप्रमाणे प्रचंड प्रमाणात मालमत्ता आढळली:
रोख रक्कम: ६,६६,००० रुपये सोने व चांदीचे दागिने: मोठ्या प्रमाणात,स्थावर-जंगम मालमत्ता: घर, प्लॉट, गुंतवणुका इत्यादी,एकूण अंदाजित मूल्य: सुमारे ४ कोटी २५ लाख रुपये अधिकाऱ्याचे वेतनमान पाहता या मालमत्तेचा स्रोत संशयास्पद असल्याने ACB ने याबाबत स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
न्यायालयीन प्रक्रिया
अटक केल्यानंतर दोघांना नागपूर येथील न्यायालयात हजर केले.केसकर यांची बारामती व इतर ठिकाणी असलेली सेवा नोंद तपासली जात आहे.पूर्वीच्या काळात सेवा करताना अशी वागणूक किंवा व्यवहार झाले का,याचा सुद्धा शोध घेतला जात आहे.
या अधिकाऱ्यांने बारामतीमध्ये सुद्धा अनेक पराक्रम केले असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.बारामतीमध्ये काम पाहत असताना त्यांच्या ड्रायव्हरची सुद्धा कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.बारामतीतूनही त्याने एजंटच्या अनेक माया गोळा केलेली असल्याची चर्चा आहे.
आरटीओ कार्यालयात शांतता
अधिकाऱ्याच्या अटकेनंतर बारामती आणि अन्य संबंधित आरटीओ कार्यालयांमध्ये मोठी खळबळ उडाली.पुढील दिवशी म्हणजेच शुक्रवारी कार्यालयात नेहमीची गर्दी दिसली नाही.कर्मचारी व दलालवर्गामध्ये भीतीचे वातावरण होते,तसेच नागरिकांमध्येही या घटनेची मोठी चर्चा सुरू होती.






