बारामती सहकारी बँकेची बार्शीत तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक
तीन महिलांसह दहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

बारामती सहकारी बँकेची बार्शीत तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक
तीन महिलांसह दहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
बार्शी शहरात बारामती सहकारी बँकेची तब्बल ६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. गहाण ठेवलेल्या जमिनीची कागदपत्रे बँकेकडून योग्य प्रक्रियेनुसार मुक्त न करता—म्हणजेच गहाणमुक्तीचा दस्त (डीड ऑफ रिलीज) नोंदवून घेतला नाही, तसेच बँकेची ‘एनओसी’ (No Objection Certificate) न घेता—सदर जमीन अप्रामाणिकपणे इतरांना विक्री करून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे बँकेचा मोठा विश्वासघात झाला असून, बँकिंग क्षेत्रात एकप्रकारे खळबळ उडाली आहे. या संदर्भात बार्शी शहर पोलिस ठाण्यात तीन महिलांसह दहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे –
१. रंगा भीमा मोरे
२. परशुराम भीमा मोरे
३. यल्लाप्पा भीमा मोरे
४. लक्ष्मीबाई भीमा गायकवाड
५. मेल्लूबाई भीमा गायकवाड(वरील सर्व – रा. परांडा रोड, बार्शी)
६. महंमद इम्रान जहांगीर काझी(रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी)
७. रिझवान जहांगिर काझी (रा. शीतल पेट्रोल पंपाशेजारी, कोंढवा, पुणे)
८. कुंडलिक यशवंत शेंडगे (रा. शेंडगे प्लॉट, उपळाई रोड, बार्शी)
९. कुमार विठ्ठल नागणे (रा. हेडेगल्ली, बार्शी)
बारामती सहकारी बँकेचे व्यवस्थापक दगडू लांबतुरे (वय ५४) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ही फसवणूक २३ नोव्हेंबर २०१६ ते ५ डिसेंबर २०२५ या दरम्यान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. म्हणजे तब्बल नऊ वर्षे हा प्रकार टप्प्याटप्प्याने सुरू होता असे प्राथमिकतः दिसून येते.






