बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाणला स्वराज फर्निचरकडून मोठी भेट
घराची शोभा वाढवण्यासाठी परकाळे बंधूंनी पुढाकार

बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाणला स्वराज फर्निचरकडून मोठी भेट
घराची शोभा वाढवण्यासाठी परकाळे बंधूंनी पुढाकार
बारामती वार्तापत्र
बिग बॉस मराठीमधून लोकप्रिय झालेल्या सुरज चव्हाणला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून दिले आहे. त्यानंतर आता आता बारामतीतील व्यावसायिकही मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. बारामती येथील सुप्रसिद्ध अशा स्वराज फर्निचरच्या माध्यमातून परकाळे बंधूंनी सुरजच्या नवीन घरासाठी सोफा, बेड, कपाट, टेबल अशा विविध गृहोपयोगी फर्निचरची भेट दिली आहे.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सूरज चव्हाण विजेता ठरला होता. बारामती तालुक्यातील मोढवे या छोट्याशा गावातील सुरजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भव्य असे घर बांधून दिले.
त्यानंतर या घराची शोभा वाढवण्यासाठी परकाळे बंधूंनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या स्वराज फर्निचरच्या माध्यमातून सुरजला घरासाठी लागणारे फर्निचर भेट दिले आहे.
सुरज चव्हाणसारख्या होतकरू कलाकाराला अजितदादांनी अलीशान घर बांधून दिले आहे.
यात खारीचा वाटा म्हणून आम्ही घरासाठी आवश्यक फर्निचर देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे सूरजचे थाटामाटात लग्न पार पडलेले असताना परकाळे बंधूंनी त्याच्या घरासाठी फर्निचर दिल्यामुळे या बंगल्याची भव्यता आणखी वाढली आहे.






