आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या माळेगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता 3300 रुपये प्रतिटन जाहीर!

या हंगामासाठी ३२७० रुपये प्रति टन इतका निश्चित झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या माळेगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता 3300 रुपये प्रतिटन जाहीर!

या हंगामासाठी ३२७० रुपये प्रति टन इतका निश्चित झाला आहे.

बारामती वार्तापत्र

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल म्हणून प्रतिटन ३३०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.

सोमेश्वर आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केल्यानंतर अजितदादा अध्यक्ष असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा दर काय असेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. ही प्रतीक्षा आता संपवत माळेगाव कारखान्याने चालू वर्षात गळीत होणाऱ्या उसाचा पहिला जाहीर केला आहे. प्रतिटन ३३०० रुपये पहिला हप्ता देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा एफआरपीनुसार ३२७० रुपये इतका पहिला हप्ता होत आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली. या घोषणेमुळे परिसरातील शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या हंगामी खर्चासाठी ही आगाऊ रक्कम महत्वाची ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Back to top button