हरित व सुंदर एमआयडीसी अभियानास प्रारंभ.
आषाढी एकादशी निमित्त शुभारंभ.
बारामती:वार्तापत्र
हरित व सुंदर बारामती एमआयडीसी अभियान सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ मंगळवार 1 जुलै रोजी आषाढी एकादशी चे औचित्य साधून हॉटेल सूर्या परिसरातील वृक्षारोपण करून करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे निमित्त बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व बारामती वनविभाग यांच्या सहकार्याने हे अभियान हाती घेतले आहे.
या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक ऊद्योजक उत्स्फूर्तपणे आपल्या कंपनीच्या परिसरात वृक्षारोपण करणेसाठी पुढे येत आहेत.
या अभियानांतर्गत बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री शरद सुर्यवंशी यांच्या हॉटेल सूर्या येथे शंभर वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष धनंजय जामदार उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी अनंत अवचट राधेश्याम सोनार महादेव गायकवाड हरीश कुंभरकर ऍड जमीर शेख आदी उपस्थित होते.