बारामती बाजार समितीच्या लिलावात सचिन सातव यांनी घेतला सहभाग; व्यापारी, हमाल आणि शेतकऱ्यांशी संवाद..!
शेतमाल लिलाव प्रक्रिया जवळून पाहिली

बारामती बाजार समितीच्या लिलावात सचिन सातव यांनी घेतला सहभाग; व्यापारी, हमाल आणि शेतकऱ्यांशी संवाद..!
शेतमाल लिलाव प्रक्रिया जवळून पाहिली
बारामती वार्तापत्र
न्यायालयीन प्रक्रियेनंतर बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला पुन्हा सुरुवात झालीय.. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून अनोख्या पद्धतीने प्रचार केला जात आहे..
आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी बारामती बाजार समितीत व्यापारी, हमाल, माथाडी कामगार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.. यावेळी झालेल्या लिलावात त्यांनी सहभाग घेतला.
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी समाजातील विविध घटकांशी थेट संवादावर भर दिला आहे.
आज त्यांनी बारामतीच्या बाजार समितीत भेट देऊन व्यापारी, हमाल, माथाडी कामगार आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान, त्यांनी शेतमाल लिलाव प्रक्रिया जवळून पाहिली आणि स्वतःही बोली लावत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी घेतलेल्या बोलीमध्ये शेतमालाला सर्वाधिक ३८११ रुपये दर मिळाला. यावेळी सचिन सातव यांनी हमाल, माथाडी कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विकासकामांची माहिती देत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.






