स्थानिक

श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर, बारामती येथे वार्षिक रथयात्रा महोत्सव उत्साहात साजरा…

समस्त दिगंबर जैन बांधवांनी कुटुंबासह उपस्थित

श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर, बारामती येथे वार्षिक रथयात्रा महोत्सव उत्साहात साजरा…

समस्त दिगंबर जैन बांधवांनी कुटुंबासह उपस्थित

बारामती वार्तापत्र

बारामती येथील श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात श्री १००८ पार्श्वनाथ भगवान यांच्या जन्म कल्याणक व श्री १००८ महावीर भगवान यांच्या दीक्षा कल्याणक निमित्ताने वार्षिक रथयात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा पवित्र महोत्सव श्री महावीर संवत २५५२ (विक्रम संवत २०८२), मार्गशीर्ष वद्य १०, रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न होणार आहे.

या निमित्ताने सकाळी नांदीमंगल, ध्वजारोहण व अभिषेक पूजा विधी पार पडणार असून त्यानंतर श्रीमजिनेंद्र देव भगवान महावीर स्वामी सिंहासनावर विराजमान होऊन रथामध्ये प्रतिष्ठित होतील.

रविवारी सकाळी ८.३० वाजता मंदिर परिसरातून रथयात्रेची भव्य मिरवणूक निघणार आहे. रथयात्रेदरम्यान जिनेंद्र भगवानांचे जयघोष, मंगल वाद्ये व भक्तिभावाने नटलेले वातावरण संपूर्ण परिसरात धर्ममय वातावरण निर्माण करेल.

या रथयात्रा महोत्सवाच्या दिवशी सालाबादप्रमाणे धर्मानुरागी श्री. शांतीलाल फुलचंद शहा (पंदारकर), बारामती यांच्या सौजन्याने अन्नसंतर्पण (पाखी) आयोजित करण्यात आले आहे. हे अन्नदान यंदा सलग ९८ व्या वर्षी होत असून, हा उपक्रम जैन समाजातील सेवाभाव व दानपरंपरेचे उत्तम उदाहरण आहे.

या पावन रथोत्सवात बारामतीसह परिसरातील समस्त दिगंबर जैन बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून धर्मप्रभावनेचे पुण्य लाभावे, असे आवाहन श्री दिगंबर जैन हुम्बड पंचमहाजन, बारामती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“वर्धतां जिनशासनम्” या मंगलकामनेसह हा महोत्सव भक्तिभाव, श्रद्धा व ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे.

Back to top button