बारामतीत तरुणाचा दगडाने ठेचून खून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
डोक्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी

बारामतीत तरुणाचा दगडाने ठेचून खून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
डोक्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी
बारामती वार्तापत्र
14 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता बारामती तालुक्यातील लेंडीपट्टी परिसरातील वेताळबाबा मैदानाच्या मधोमध घटना घडली.
या घटनेत अविनाश उर्फ माउली धनंजय लोंढे (वय 20) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो फिर्यादीचा मुलगा आहे.
या प्रकरणातील फिर्यादी धनंजय प्रभाकर लोंढे (वय 43) असून ते निरा रोड, म्हसोबा मंदिर परिसरात चहाची हातगाडी चालवतात.यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 460/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 3(5) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 3(1)(r), 3(2)(v) प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,आरोपी समिर इकबाल शेख (वय 25), व्यवसाय – चप्पल दुकान, रा. देवळे पार्क सोसायटी, पहिला मजला, मळद रोड, बारामती,प्रथमेश राजेंद्र दळवी (वय 20), व्यवसाय – वॉलमार्ट कंपनीत हेल्पर, रा. जगताप मळा, खंडोबानगर, ईदगाह जवळ, बारामती या दोघांनी मिळून संगनमताने, अविनाश उर्फ माउली याने त्यांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला केला.
आरोपींनी दगडाने त्याच्या डोक्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.






