आज बारामतीत अजितदादांची उपस्थिती; राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेला उपस्थित राहणार
अजितदादा मतदारांना कोणता संदेश देणार...

आज बारामतीत अजितदादांची उपस्थिती; राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेला उपस्थित राहणार
अजितदादा मतदारांना कोणता संदेश देणार…
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. आज गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बारामतीतील शारदा प्रांगण येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सांगता सभा होणार असून, या सभेला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराची अधिकृत सांगता शुक्रवारी होणार आहे. त्याआधीच ही सभा होत असून, त्यामुळे या सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अजितदादांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्येही या सभेकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
सध्या बारामती नगरपरिषदेवर अजितदादांची सत्ता असून, या निवडणुकीत त्यांनी व्यापक राजकीय धोरण अवलंबत काही विरोधकांनाही आपल्या सोबत सामावून घेतले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या सभेतून अजितदादा मतदारांना कोणता संदेश देतात आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोणते मुद्दे अधोरेखित करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






