राजकीय

अजित पवारांनी चहाचा आस्वाद; बारामतीकरांशी साधला आपुलकीचा संवाद

बारामतीकरांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

अजित पवारांनी चहाचा आस्वाद; बारामतीकरांशी साधला आपुलकीचा संवाद

बारामतीकरांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

बारामती वार्तापत्र 

राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून पहाटेच्या वेळेस गारठा अधिक जाणवत आहे. अशा वातावरणात गरमागरम चहाचा घोट घेत दिवसाची सुरुवात करण्याचा आनंद काही औरच असतो. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील आकाश टी कॉर्नर येथे अचानक भेट देत पहाटेच्या चहाचा आस्वाद घेतला.

या वेळी अजित पवार यांनी चहाचा आस्वाद घेताना उपस्थित बारामतीकरांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. स्थानिक नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी सर्वांची विचारपूस केली. थंडी, शेती, स्थानिक प्रश्न, तसेच दैनंदिन जीवनातील अडचणी यावरही या गप्पांदरम्यान चर्चा झाली. अजित पवार यांचा हा साधा, अनौपचारिक आणि लोकांमध्ये मिसळणारा स्वभाव पाहून उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

साध्या चहाच्या टपरीवर बसून सामान्य नागरिकांशी संवाद साधल्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा ‘लोकनेते’ म्हणून दिसून आले. या भेटीमुळे केवळ चहाचा आस्वादच नव्हे, तर लोकांशी थेट संवाद साधत सकाळची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण आणि सकारात्मक झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Back to top button