राजकीय

बारामतीकरांचा विश्वास सार्थ करून दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; सचिन सातव यांची अजितदादांसमोर जोरदार बॅटींग

संधीबद्दल पक्ष संघटनेचे त्यांनी आभार मानले.

बारामतीकरांचा विश्वास सार्थ करून दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; सचिन सातव यांची अजितदादांसमोर जोरदार बॅटींग

संधीबद्दल पक्ष संघटनेचे त्यांनी आभार मानले.

बारामती वार्तापत्र 

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार, अजितदादांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी दिली.

बारामती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार सांगता सभा बारामती शहरातील शारदा प्रांगण येथे पार पडली. या सभेला संबोधित करत सचिन सातव यांनी उपस्थितांची मनं जिंकली.

यावेळी बोलताना सचिन सातव म्हणाले की, सातव कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीला नगराध्यक्ष पदासाठी काम करण्याची संधी मिळत असून ही बाब अभिमानाची आहे. पक्षाने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू आणि दिलेल्या संधीचं सोनं करू, असे त्यांनी सांगितले.

बारामती शहराच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी शहरातील सर्व घटकांच्या समस्या माहित असल्याचे नमूद केले. आमराई, कसबा तसेच इतर भागांतील घरकुल योजनांचे प्रश्न आणि झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून काम केले जाईल. बारामतीला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा आमचा संकल्प असून या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सचिन सातव म्हणाले की, बारामतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या अजित पवार यांनी त्यांना नगराध्यक्ष पदासाठी तसेच ४१ सहकाऱ्यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे. हा विश्वास कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पक्ष संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी सर्व उमेदवार एकदिलाने काम करतील.

दिलेल्या संधीबद्दल पक्ष संघटनेचे त्यांनी आभार मानले.
भाषणाच्या शेवटी मतदारांना आवाहन करताना सचिन सातव यांनी सांगितले की, ४१ उमेदवारांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ३३ नगरसेवक उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्याला मतदार प्रचंड बहुमताने विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात बारामती शहराचा विकास आणि प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button