स्थानिक

बारामती नगरपरिषदेत कोणाला किती मते मिळाली?वाचा सविस्तर

सचिन सातव यांना एकट्याला 47 हजार 370 मते मिळाली,

बारामती नगरपरिषदेत कोणाला किती मते मिळाली?वाचा सविस्तर

सचिन सातव यांना एकट्याला 47 हजार 370 मते मिळाली,

बारामती वार्तापत्र 

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी तब्बल 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये 68 हजार 298 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सचिन सातव यांना एकट्याला 47 हजार 370 मते मिळाली, तर त्यांच्या खालोखाल बहुजन समाज पक्षाचे काळूराम विनायक चौधरी यांना 8069 मते मिळाली.

या दोघांमधील फरक 39301 मतांचा होता.

बारामतीतील पहिल्या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अविनाश हनुमंत निकाळजे यांनी विजय मिळवला. त्यांना 2376 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश पोपट अडागळे यांना 2170 मते मिळाली. याच प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा समीर चव्हाण यांनी विजय मिळवला. त्यांना 2350 मते मिळाली, तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उज्वला पोपट अंबुरे यांना 2152 मते मिळाली. या प्रभागामध्ये 4704 मतदारांनी मतदान केले होते.

दुसऱ्या प्रभागात एक उमेदवार अनुप्रीता डांगे या बिनविरोध झाल्या होत्या. दुसऱ्या जागेसाठी झालेल्या मतदानात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष जय नानासाहेब पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय केले. या प्रभागात 2061मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी तब्बल 1734 मते जय पाटील यांना मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकज राजू पवार यांना 221 मते मिळाली.

तिसऱ्या प्रभागात प्रवीण दत्तू माने या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराने 1554 मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संतोष दत्तात्रय आटोळे यांना एक हजार तीन मते मिळाली. या ठिकाणी 2570 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तिसऱ्या प्रभागात रूपाली नवनाथ मलगुंडे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार 2003 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रेखा सुभाष कचरे यांना अवघी 440 मते मिळाली.

चौथ्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार संपदा सुमित चौधर यांनी 2221 मते मिळवून एकतर्फी विजय मिळवला. या ठिकाणी 3217 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. चौधर यांना अपक्ष उमेदवार योगिता राहुल सोन्ने यांनी लढत दिली. त्यांना 715 मते मिळाली. चौथ्या ब प्रभागात विष्णू तुळशीराम चौधर या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराने 1379 मते मिळवत विजय मिळवला. मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार शिवाजीराव जगन्नाथ भोसले यांनी कडवी लढत दिली. त्यांना १२७३ मते मिळाली. अवघ्या 106 मतांनी विष्णुपंत चौधर हे विजय झाले.

पाचव्या प्रभागात एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाला होता. महिला उमेदवाराच्या जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार वनिता अमोल सातकर यांनी तब्बल 2348 मते मिळवून विजय मिळवला. या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा प्रताप पागळे यांना 1876 मते मिळाली. या ठिकाणी 4298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सातकर यांच्या रूपाने बारामती मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने पहिल्यांदाच विजय मिळवून नगर परिषदेमध्ये एन्ट्री केली.

बारामतीच्या सात अ प्रभागामध्ये उच्चशिक्षित मतदार वर्ग असतानाही या ठिकाणी मतदान कमी प्रमाणात झाले. या ठिकाणी 1656 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये बारामतीच्या वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद भगवान खारतोडे यांनी 999 मते मिळवत विजय मिळवला. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे पक्षाचे उमेदवार होते.‌ या प्रभागात भाजपचे उमेदवार सुजित आनंदराव वायसे यांना 385, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे यांना 258 मते मिळाली.

सात ब या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार भारती विश्वास शेळके यांनी 1565 मते मिळवत विजय मिळवला या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार मेघा सुरेंद्र जेवरे यांना 354 मते मिळाली.

आठव्या प्रभागामध्ये 3035 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अमर बाळासाहेब धुमाळ यांनी त्यातील 2235 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. या प्रभागात अपक्ष उमेदवार सुदर्शन नीचल यांना 735 मते मिळाली.

नवव्या प्रभागात 3 हजार 920 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या विशाल भानुदास हिंगणे यांनी 1960 मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये भाजपचे अभिषेक चिंचकर यांना 711 मते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत लोणकर यांना 528 मते, तर अपक्ष उमेदवार ज्ञानदेव काळे यांना 475 मतं मिळाली. याच प्रभागात महिला प्रवर्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार पुनम ज्योतिबा चव्हाण यांना 2881 मते मिळाली. त्या विजयी झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार शोभा सुरेश चव्हाण यांना 605 मते मिळाली.

दहाव्या अ क्रमांकाच्या प्रभागात 2777 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये अपक्ष उमेदवार मनीषा संदीप बनकर यांनी 1735 मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता सुरेश गायकवाड यांना अवघी 990 मते मिळाली. दहाव्या ब क्रमांकाच्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार जयसिंग अशोक काटे देशमुख यांना तब्बल 2258 मते मिळाली त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अझरुद्दीन इनामदार यांना अवघी 227 मते मिळाली.

11 अ प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सविता सुजित जाधव यांनी 2167 मते मिळवत विजय मिळवला त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार माया त्रिशरण खुंटे यांना अवघी 770 मते मिळाली या ठिकाणी 3257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 11 ब प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार संजय वालचंद्र संघवी यांना 1834 मते मिळाली. ते विजयी झाले तर अपक्ष उमेदवार गणेश लंकेश्वर यांना 900 मते मिळाली.

बाराव्या अ प्रभागात 2361 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सारिका अमोल वाघमारे यांना 1641 मते मिळाली. त्या विजयी झाल्या, तर बसपाच्या पूजा गणेश अहिवळे यांना 359 मते मिळाली. 12 व्या ब प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत यशवंत चव्हाण यांना 1781 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नितीन रामचंद्र भामे यांना 502 मते मिळाली.

तेराव्या अ प्रभागांमध्ये 3683 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आरती मारुती शेंडगे -गव्हाळे यांनी बाजी मारली. त्यांना 1924 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सुनीता बगाडे यांना 1479 मते मिळाली. तेराव्या ब प्रभागामध्ये बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू भाऊसाहेब मांढरे यांनी विजय मिळवला. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार होते. त्यांना 1864 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अश्विन साबळे यांना 1431 मते मिळाली.

14 प्रभागांमध्ये 3396 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या जायंट किलर ठरलेल्या बारामतीतील सर्वात तरुण उमेदवार संघमित्रा काळुराम चौधरी यांनी 1619 मते मिळवली व विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार स्वाती आप्पासाहेब अहिवळे यांना 1110 मते तर शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार स्नेहा अहिवळे यांना 579 मते मिळाली. 14 ब प्रभागामध्ये नवनाथ सदाशिव बल्लाळ या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने 1522 मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास निकाळजे यांनी 924 मते मिळवली.

पंधराव्या प्रभागात 3918 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार 2713 मते मिळवत मंगल जयप्रकाश किर्वे या विजयी झाल्या. या ठिकाणी भाजपच्या गौरी ओंकार एकशिंगे यांना 967 मते मिळाली.

15 ब प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार यशपाल सुनील पोटे यांनी आश्चर्यकारक विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का दिला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीतील बडे नेते किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर हे पक्षाकडून निवडणुकीला उभे होते. त्यांना 1405 मते मिळाली.

सोळाव्या अ प्रभागात 4587 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार गोरख ज्ञानदेव पारसे यांनी तब्बल 3877 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. सोळाव्या ब प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार मंगल शिवाजीराव जगताप यांनी 3464 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. या ठिकाणी शिवसेनेच्या मेघा सुरेंद्र देवरे यांना 599 मते मिळाली.

सतराव्या अ प्रभागामध्ये 3304 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अल्ताफ हैदर सय्यद यांनी 1627 मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी अपक्ष उमेदवार प्रदीप दादा लोणकर यांनी 988 मतं मिळवत त्यांना लढत दिली.

अठराव्या अ प्रभागामध्ये 4138 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार राजेंद्र बाबुराव सोनवणे यांनी 2967 मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राजेश वसंतराव कांबळे यांनी 915 मते मिळवत त्यांना लढत दिली.

19 व्या अ प्रभागामध्ये 3815 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार प्रतिभा विजय खरात यांनी 2737 मते मिळवत विजय मिळवला. या ठिकाणी भाजपच्या संगीता प्रकाश दामोदरे यांनी 522 मते मिळवली. 19 व्या ब प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार व माजी विरोधी पक्षनेते सुनील दादासाहेब सस्ते यांनी 1869 मते मिळवत विजय मिळवला. त्यांना अपक्ष उमेदवार विकास पांडुरंग खोत यांनी 912 मते मिळवत लढत दिली.

20 व्या प्रभागांमध्ये 4775 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अपक्ष उमेदवार निलेश इंगोले हे जायंट किलर ठरले. त्यांनी 2302 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार प्रथमेश प्रवीण गालींदे यांचा पराभव केला. प्रथमेश गालींदे यांना 2063 मते मिळाली. 20 प्रभागांमधील क प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार दर्शना विक्रांत तांबे यांनी 3745 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला.

Back to top button