राजकीय

बारामतीत लक्ष्मण हाकेंनी सभा घेतली,’ती’संघमित्रा चौधरी जिंकली;21 वर्षांच्या संघमित्राकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव

प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा काळूराम चौधरी या विजयी झाल्या आहेत

बारामतीत लक्ष्मण हाकेंनी सभा घेतली,’ती’संघमित्रा चौधरी जिंकली;21 वर्षांच्या संघमित्राकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव

प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा काळूराम चौधरी या विजयी झाल्या आहेत

बारामती वार्तापत्र 

बारामतीत लक्ष्मण हाकेंनी दिलेलं आव्हान, ‘ती’ संघमित्रा काळुराम चौधरी जिंकली; 21 वर्षांच्या संघमित्राकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव मात्र, महिला शहराध्यक्षांसह इतर सहा उमेदवारांवर पराभवाची नामुष्की ओढविली आहे. अन्य सहा विजयी उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत प्रचार केला होता.तिचा आपली कन्या असा उल्लेख करत हाकेंनी विजयाचा आनंदही साजरा केला आहे.

बारामतीतील प्रभाग क्रमांक १४ मधून संघमित्रा काळूराम चौधरी या विजयी झाल्या आहेत. केवळ २१ वर्षांच्या संघमित्रा यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. काळूराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे राज्याचे महासचिव असून मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी यापूर्वीही नगरपरिषदेसह विधानसभा व लोकसभेचीही निवडणूक लढविली आहे.

काळूराम चौधरी यांना एकदाही यश मिळाले नव्हते. पवार कुटुंबीयांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या चौधरी यांच्या लेकीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे. ते स्वत: या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र, त्यांचा दारूण पराभव झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या दोघांच्या प्रचारासाठी बारामतीत पदयात्रा काढली होती. सभाही घेतली होती.

हाके यांनी बारामतीतील सभेमध्ये अजित पवारांना चॅलेंज देत संघमित्रा यांचा विजय निश्चित असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्यांच्या विजयानंतर हाकेनंतर सोशल मीडियात आपल्या या भाषणाचा व्हिडीओ तसेच फोटो पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. नियोजनबद्ध प्रचार, लोकाभिमुख वचननामा, विकासाचा केलेला वादा आणि माझे बंधू ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांक बांधवांचे मसीहा काळूराम चौधरी यांच्या वैचारिक संघर्षाला अखेर यश आल्याचे हाकेंनी म्हटले आहे.

बारामती नगरपालिकेच्या सांगता सभेत मी आत्मविश्वासाने जाहीर केल्याप्रमाणे माझी कन्या अ‍ॅड. संघमित्रा काळुराम चौधरी नगरसेवकपदी जनतेच्या आशीर्वादाने विराजमान झाल्याचे हाके यांनी म्हटले आहे. हाके यांनी बारामतीतील सभेमध्ये अजित पवारांवर जोरदार टीका केली होती.

Back to top button