राजकीय

बारामतीत अपक्ष व राष्ट्रवादीच्या एकत्रित अभिनंदनाचे फलक

“अशोक काका सांगतील त्यालाच तिकीट”

बारामतीत अपक्ष व राष्ट्रवादीच्या एकत्रित अभिनंदनाचे फलक

“अशोक काका सांगतील त्यालाच तिकीट”

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील पाटस रोड परिसरात लावण्यात आलेल्या एका अभिनंदन फलकामुळे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार गायकवाड यांचा पराभव करत सौ. मनिषा संदिप बनकर या विजयी झाल्या.

मात्र त्यांच्या विजयानंतर लावण्यात आलेल्या अभिनंदन फलकाने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.या परिसरावर स्वर्गीय अशोक काका देशमुख यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले असून, त्यांच्या शब्दाला त्या भागात मोठे महत्त्व होते.

“अशोक काका सांगतील त्यालाच तिकीट” अशीच राजकीय परंपरा या भागात रूढ होती. अशा पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवाराचा विजय आणि त्यानंतरचा हा अभिनंदन फलक अधिकच लक्षवेधी ठरत आहे.

विशेष म्हणजे, या अभिनंदन फलकावर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी तसेच पक्षाशी संबंधित प्रमुख चेहरे एकत्रितपणे झळकत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे अपक्ष उमेदवाराच्या विजयामागील पक्षांतर्गत गटबाजी आणि अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेल्या उमेदवाराचे,त्याच पक्षातील निवडून आलेल्या नगरसेवकांचे जाहीर अभिनंदन होणे. याची चर्चा सुरू आहे.

या घटनेनंतर “अपक्ष उमेदवार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?” अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

Back to top button