स्थानिक

बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी कामाला केली सुरुवात; भाजी मंदाईत जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी

जनतेनं आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी दिली

बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी कामाला केली सुरुवात; भाजी मंदाईत जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी

जनतेनं आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी दिली

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून सचिन सातव यांची मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. नगरपरिषदेचा पदभार अद्याप स्वीकारला नसला तरी सचिन सातव यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आज त्यांनी बारामतीतील गणेश भाजी मंडई येथे जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या लवकरात लवकर सोडवण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बारामती नगरपरिषद निवडणुकीनंतर अद्याप नवीन कारभाऱ्यांना पदभार मिळालेला नाही. असं असलं तरी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यायला सुरुवात केली आहे.  सकाळीच त्यांनी बारामती येथील गणेश भाजी मंडईला भेट देत येथील विक्रेत्यांशी संवाद साधला. या चर्चेवेळी त्यांनी भाजी मंडईतील समस्यांचा आढावा घेतला. तसेच येणाऱ्या काळात प्राधान्यानं या अडचणी सोडवल्या जातील, असं आश्वासनही दिलं.

या भेटीदरम्यान, विक्रेत्यांनी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करत नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. नगरपरिषदेचा पदभार अद्याप स्वीकारला नसला तरी ज्या जनतेनं आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी दिली, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचा समस्या जाणून घेणं महत्वाचं आहे.

त्यामुळं पदभार मिळण्याची वाट न पाहता आपण लोकांच्यात जाऊन त्यांच्या भेटी घेत असून त्यांनी सांगितलेल्या अडचणी लवकरात लवकर सुटाव्यात यावर आपला भर असणार आहे, असं नगराध्यक्ष सचिन सातव यांनी यावेळी सांगितलं.
आज त्यांनी बारामती बसस्थानक, बाजार समिती आणि गणेश भाजी मंडई येथे भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, निवडणूक काळात लोकांशी व्यक्तीगत भेटीगाठी घेणाऱ्या सचिन सातव यांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद सुरू केला आहे.

त्यामुळं त्यांच्या कामाची हटके स्टाईल बारामतीकरांना भावणारी ठरली आहे.

Back to top button