क्राईम रिपोर्ट

बारामतीत खंडणी न दिल्याने हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

८,३०० रुपयांची दरोड्याने लूट; सात आरोपींसह दोन अनोळखींचा सहभाग.

बारामतीत खंडणी न दिल्याने हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

८,३०० रुपयांची दरोड्याने लूट; सात आरोपींसह दोन अनोळखींचा सहभाग.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरातील चिंचकर चौक परिसरात खंडणी न दिल्याच्या रागातून एका हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दहशत माजवत रोख रकमेची लूट केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 471/2025 अन्वये BNS कलम 311, 308, 310, 109, 115(2), 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आकाश सिद्धनाथ काळे (वय 29 वर्षे, व्यवसाय – हॉटेल, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बारामतीतील प्रगतीनगर, चिंचकर चौक परिसरात “आपले चायनीज” नावाचे हॉटेल चालवतात.

१५ दिवसांपूर्वी खंडणीची मागणी फिर्यादीनुसार, आरोपींनी सुमारे १५ दिवसांपूर्वी फिर्यादीकडे हॉटेल चालू ठेवण्यासाठी प्रोटेक्शन मनी (खंडणी) मागितली होती. मात्र फिर्यादीने ही मागणी स्पष्टपणे नाकारली होती. या नकाराचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने हल्ल्याचा कट रचला.

कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न
दि. 26/12/2025 रोजी रात्री सुमारे 8.19 वाजण्याच्या सुमारास, आरोपी फिर्यादीच्या हॉटेलमध्ये घुसले. आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला.

गल्ल्यातील ८,३०० रुपयांची जबरदस्तीने लूट हल्ल्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील गल्ल्यात हात घालून ८,३०० रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. या रकमेत ५०० रुपयांच्या १६ नोटा व १०० रुपयांच्या ३ नोटा होत्या. दहशत निर्माण करून शस्त्रांच्या धाकाने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
आरोपींची नावे व पार्श्वभूमी या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

विनायक मारक राहुल चव्हाण (वरील दोघांवर सन 2018 मध्ये गुन्हा र.नं. 779/2018, कलम 302, 120(ब), 386, 387 दाखल आहे) राज गावडे आदित्य बगाडे निहाल जाधव (याच्यावर गु.र.नं. 87/2024 भादवी कलम 338, 337, 279, 427 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 अंतर्गत गुन्हा दाखल) विवेक (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच दोन अनोळखी आरोपी असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सर्व आरोपी शेळकेवस्ती, दादा पाटीलनगर, तांदुळवाडी, बारामती येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

उपचारानंतर तक्रार दाखल हल्ल्यानंतर फिर्यादीस पोलीस स्टेशनमार्फत वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर दि. 27/12/2025 रोजी फिर्यादीने अधिकृत तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याची नोंद स्टे डा. नोंद क्रमांक 037/2025 प्रमाणे दि. 24/12/2025 रोजी सायं. 4.11 वाजता करण्यात आली आहे.
तपास सुरू या गुन्ह्याची नोंद पोलिस धुमाळ (ब. नं. 2361) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करत आहेत. शहरात वाढत्या खंडणी व दहशतीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button