क्रीडा

राज्यस्तरीय  लोकगीत व लोकनृत्य स्पर्धेत  टी. सी. महाविद्यालयास पारितोषिक

लोकगीत व लोकनृत्यास प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस

राज्यस्तरीय  लोकगीत व लोकनृत्य स्पर्धेत  टी. सी. महाविद्यालयास पारितोषिक

लोकगीत व लोकनृत्यास प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र शासन युवक व क्रीडा सेवा संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवात बारामती येथील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने घवघवीत यश संपादन केले आहे.

मुबंई, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर लातूर,नाशिक कोल्हापूर आणि पुणे.या  विभागातून विविध महाविद्यालयांच्या सहभागातून पार पडलेल्या या स्पर्धेत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत टी. सी. महाविद्यालयाच्या लोकनृत्य व लोकगीत या दोन्ही संघांनी तृतीय क्रमांक पटकवला व प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस  तसेच करंडक पटकावून राज्यस्तरीय विभागात  स्थान मिळवले.

ही राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धा गदीमा नाट्यगृह पिंपरी चिंचवड, पुणे येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून 400 स्पर्धक सहभागी  झाले होते.टी. सी. महाविद्यालयातील एकूण २० विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेत झाली होती. ही स्पर्धा एकूण तीन दिवस चालली.

यामध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक फेरी काढण्यात आली होती. या फेरी मध्ये महाविद्यालयातून पारंपारिक वारी प्रकार  सादर करण्यात आला.प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. भिमराव तोरणे, प्रा.सोमनाथ कदम, प्रा राजेंद्र कंडरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मा.श्री.मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य, प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

Back to top button