स्थानिक

बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरा झाला पत्रकार दिन, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सन्मान

शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरा झाला पत्रकार दिन, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सन्मान

शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र 

नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकारानं आज बारामती शहर, तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच बारामती नगरपरिषदेत पत्रकार दिन साजरा करत पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

बारामतीच्या विकासात येथील पत्रकारांचंही तितकंच असून पत्रकारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुख्याधिकारी पंकज भुसे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी बारामतीच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या सन्मान सोहळ्याबद्दल आभार व्यक्त केले. बारामती शहरात विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्यात पत्रकार भवन आणि निवास यासाठीही प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एखादी गोष्ट समाजापर्यंत पोहचवण्याचं काम ते करत आहेत. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मुद्रीत माध्यमाचं महत्व कधीही कमी होणार नाही असं सांगत सचिन सातव यांनी माध्यमातील बदलांचा आढावा घेतला. पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून काम करणारा घटक असून त्यांच्या अडीअडचणी व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बारामतीचा सर्वांगिण विकास होत आहे. या विकासात पत्रकारांचंही योगदान नाकारता येणार नाही.

त्यामुळं येणाऱ्या काळातही पत्रकारांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून सर्व नगरसेवक आणि प्रशासनाच्या माध्यमातून उत्तम काम करू असा विश्वास त्यांनी दिला. यापुढील काळातही राज्यकर्ते, प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वय राहावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button