बारामती नगरपरिषद उपाध्यक्ष निवड व नामनिर्देशित सदस्य नियुक्तीसाठी विशेष सभेचे आयोजन
सभेमध्ये दोन महत्त्वाचे विषय चर्चेसाठी

बारामती नगरपरिषद उपाध्यक्ष निवड व नामनिर्देशित सदस्य नियुक्तीसाठी विशेष सभेचे आयोजन
सभेमध्ये दोन महत्त्वाचे विषय चर्चेसाठी
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड तसेच नगरपरिषदेत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नगरपरिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात होणार आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ए (१ ते १५) अन्वये अध्यक्षांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ही सभा बोलावण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषद अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनी दिली आहे.
या सभेमध्ये दोन महत्त्वाचे विषय चर्चेसाठी व निर्णयासाठी घेण्यात येणार आहेत.पहिल्या विषयांतर्गत नवनिर्वाचित नगरपरिषद सदस्यांमधून उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. नगरपरिषदेतील सत्ताकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून,कोणत्या सदस्याकडे उपाध्यक्षपद जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या विषयांतर्गत नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या नियुक्त्यांमुळे नगरपरिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व सामाजिक कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
उपाध्यक्ष पदाची निवडणूक व नामनिर्देशित सदस्य नियुक्तीचा संपूर्ण कार्यक्रम सभेसोबत जोडलेला असून, सर्व नगरपरिषद सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनी केले आहे.या सभेमुळे बारामती नगरपरिषदेच्या आगामी कारभाराला दिशा मिळणार असून,राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.






