स्थानिक

बारामती नगरपालिकेसमोर नवीन वर्षात विविध मागण्यांसाठी उपोषणाचे ग्रहण

चक्री, मटका, गावठी दारू, ताडी, गांजा व जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू

बारामती नगरपालिकेसमोर नवीन वर्षात विविध मागण्यांसाठी उपोषणाचे ग्रहण

चक्री, मटका, गावठी दारू, ताडी, गांजा व जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिका निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडल्यानंतर आता बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील विविध मागण्यांसाठी नागरिक उपोषणास करण्यास सुरुवात केली आहे.

नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी कार्यभार घेतल्यानंतर आता नागरिक एक ना अनेक प्रश्नांसाठी उपोषणास बसत असल्यामुळे बारामती नगरपालिकेच्या हद्दीत किती नक्की किती अडचणी आहेत.हे नागरिक उपोषण करत असल्यामुळे लक्षात येत आहे.व उपोषण केल्यानंतरच या अडचणी दूर होणार का असा प्रश्न पडला आहे.

बारामती शहरातील सामाजिक प्रश्न, अतिक्रमण व वाढत्या अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामागे समाजाच्या मूलभूत गरजा, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधातील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
कैकाडी समाज, तांबोळी (मुस्लिम) समाज तसेच मेहतर-वाल्मिकी समाजासाठी प्रशस्त व सुसज्ज समाज मंदिर उभारण्यात यावे.

या समाजांना एकत्र येण्यासाठी, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अद्यापही योग्य जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या मालकीच्या जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे.

नगरपरिषदेच्या नावावर असलेल्या मौल्यवान जमिनींवर धनदांडग्या लोकांनी बेकायदा अतिक्रमण केले असून, यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. ही अतिक्रमणे तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत.

चक्री, मटका, गावठी दारू, ताडी, गांजा व जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असून, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी घालून चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

या बेमुदत उपोषणात पुढील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले आहेत — सचिन (पप्पु वस्ताद) माने,अॅड.आकाश प्रकाश दामोदरे, शहाजी कदम, फिरोज (मुन्ना) तांबोळी, मुकेश वाघेला,महेश नेटके,पिंकीताई मोरे, सारिकाताई लोंढे,सविता पवार यांनी

प्रशासनाला इशारा
उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला असून,जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील.या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांचा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने वेळेत तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

Back to top button